Home विदर्भ पीक’ पाहणी ठरतेय शेतकऱ्यांची नवी छळवणूक!; डोक्‍यावरचा खेळ!!; शेतकऱ्यांनी वाचला अडचणींचा पाढा...

पीक’ पाहणी ठरतेय शेतकऱ्यांची नवी छळवणूक!; डोक्‍यावरचा खेळ!!; शेतकऱ्यांनी वाचला अडचणींचा पाढा –

432
0

राजेंद्र पाटील राऊत

पीक’ पाहणी ठरतेय शेतकऱ्यांची नवी छळवणूक!; डोक्‍यावरचा खेळ!!; शेतकऱ्यांनी वाचला अडचणींचा पाढा –

ब्यूरो चीफ स्वप्निल देशमूख युवा मराठा न्यूज
ः महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी ई- पीक पाहणी हा प्रकल्प कार्यान्वित केला. मात्र जिल्ह्यात या योजनेचे तीनतेरा वाजल्याचे “यूवा मराठा न्यूज च्या लक्षात पाहणीत समोर आले. सातबाऱ्यावरील गाव नमुना बारामध्ये शेतकऱ्याच्या पिकांची नोंद यापूर्वी तलाठी घेत होते. मात्र आता शेतकऱ्यांनीच ई -पीक पाहणी या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे स्वतःच्या पिकांची नोंद करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मात्र काही शेतकऱ्यांना स्मार्टफोन हाताळणी येत नाही, काहींच्‍या मोबाइलमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत तर काही शेतकऱ्यांना ही माहिती भरता येत नाही… असे चित्र आहे. यांनी ई पीक पाहणी म्हणजे “सगळा डोक्यावरचा खेळ’ असल्याचे म्हटले आहे. विशेष. वेगवेगळ्या समस्यांमुळे आधीच त्रस्‍त असलेल्या शेतकऱ्यांच्या या छळवणुकीमागे राज्‍य सरकारचा उद्देश लक्षात येण्यासारखा नसला तरी, शेतकरी मात्र मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे. आधीप्रमाणे कर्मचाऱ्यांनीच हे काम करावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
ई-पीक पाहणी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने जिल्हा व तालुकास्तरावर समितीचे गठन केले आहे. मात्र जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी कार्यक्रमाअंतर्गत पिकांची नोंदणी केली याबद्दल जिल्ह्याच्या प्रकल्प समन्वयक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सध्या आपल्याकडे माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगितले. यूवा मराठा न्यूज ने शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणींचा पाढाच सांगितला.

या आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी…
बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नाही. असला तरी तो हाताळण्याचे पुरेसे कौशल्य नाही. बऱ्यांच गावांमध्ये इंटरनेटची समस्या आहे. ॲपमध्ये माहिती जास्त भरावी लागते. अनेकदा ॲप काम करत नसल्याच्या तक्रारीसुद्धा शेतकऱ्यांनी केल्या आहेत. गावातील ई सेवा केंद्र आणी काही अँड्रॉइड मोबाइलधारक युवक या कामासाठी शेतकऱ्यांकडून २०० ते ३०० रुपये घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. किचकट प्रकियेमुळे गावागावातील १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनीच पिकांची नोंदणी केली आहे.

मुदतवाढ मिळाली…
ई-पीक पाहणी प्रकल्पाच्‍या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांना १५ सप्‍टेंबर तर तलाठी स्‍तरावरील नोंदणीसाठी ३० सप्‍टेंबरपर्यंतचा कालावधी होता. तो कोरोना, अतिवृष्टी, पूर आणि उशिराच्‍या मान्सूनमुळे वाढविण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी आता ३० सप्‍टेंबरपर्यंतची तर तलाठ्यांसाठी १५ ऑक्‍टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

तलाठ्यांत वेगळीच कुजबूज…
पीक पेरा भरण्याचे काम यापूर्वी तलाठी करायचे. मात्र तलाठ्यांकडील कामे हळूहळू कमी करून तलाठी हे पदच कमी करण्याचा शासनाचा डाव असू शकतो, अशी कुजबुज सुद्धा तलाठ्यांमध्ये आहे.

काहींनी सुरू केली शेतकऱ्यांची लूट…
शेतकऱ्यांना पीक नोंदणी करावी लागणार असल्याने अनेकांनी या गोष्टीचा फायदा उचलला असून, माहिती भरून देण्यासाठी आर्थिक लूट सुरू केली आहे. याबाबत तक्रार करण्याचीही सोय नसल्याने शेतकऱ्यांच्‍या अडचणीत मात्र भर पडली आहे. अाधीच सततच्‍या नुकसानीमुळे त्रस्‍त शेतकरी यामुळे अक्षरशः वैतागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here