Home विदर्भ आसूड’, “एल्गार’ इफेक्‍ट! १०० कोटी आले, शेतकऱ्यांची दिवाळी गोड

आसूड’, “एल्गार’ इफेक्‍ट! १०० कोटी आले, शेतकऱ्यांची दिवाळी गोड

95
0

राजेंद्र पाटील राऊत

आसूड’, “एल्गार’ इफेक्‍ट! १०० कोटी आले, शेतकऱ्यांची दिवाळी गोड
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलढाणा
निसर्गाच्या क्रूर तांडवाने खरीप हंगाम उद्‌ध्वस्त झालेल्या बुलडाणा जिल्ह्यासाठी निधी देण्यास शासनाला अखेर मुहूर्त मिळाला! यातही शासनाने हात आखडता घेत तुर्तास ७५ टक्केच मदत निधी उपलब्ध करून दिलाय!! जिल्ह्यासाठी तूर्तास १०० कोटी ५० लाख २४ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. ही मदतवजा भरपाई शेतकऱ्यांना लवकर मिळाली तर त्यांना दिवाळी साजरी करता येणार असल्याने अल्पावधीत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आव्हान यंत्रणासमोर उभे ठाकले आहे.

ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ दरम्यान जिल्ह्यात अभूतपूर्व अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिके, फळबागा, बहुवार्षिक पिकांची अतोनात नासाडी झाली. सर्वेक्षण वजा पंचनामे करण्यात आले असता १ लाख ३२ हजार ६४३ शेतकऱ्यांच्या १ लाख ३३ हजार ७७५ हेक्टरवरील हिरव्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे निष्पन्‍न झाले.

तपशीलवार सांगायचे झाल्यास १ लाख ३१ हजार ९४२ शेतकऱ्यांच्या १ लाख ३३ हजार ३६१ हेक्टरवरील खरीप पिके मातीमोल ठरलीत. आश्वासित सिंचनाखालील ३४३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ६३७ शेतकरी बाधित झाले. याशिवाय ६४ शेतकऱ्यांच्या ५० हेक्टरवरील बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याचे आढळले. या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या ( एसडी आरएफ) दराने निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले.

दरम्यान १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जून ते ऑक्टोबर दरम्यानच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शासनाने दोन्ही हेडवर मदत मंजूर केली. मात्र तूर्तास ७५ टक्के निधीच मंजूर केला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी तूर्तास ७७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्यावर १०० कोटी ५० लाख ४० हजार रुपये आले आहे. एसडीआरएफ दराने ६८ कोटी ४३ लाख तर वाढीव दराने ३२ कोटी ७ लाख मंजूर करण्यात आले आहेत. याचे सर्व तालुक्यांना लवकरच वितरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी नियोजन करण्यात आल्याचे नायब तहसीलदार संजय बनगाळे यांनी सांगितले.

Previous articleहिंगणी बेर्डी येथील कु.अनिकेत गोरख खैरे यांची दौंड तालुका भारतीय जनता पार्टी (विद्यार्थी आघाडी) उपाध्यक्ष पदी निवड
Next articleआर्थिक साक्षरतेतून होईल महिलांचे सक्षमीकरण महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here