Home नांदेड नांदेड जिल्ह्यात झालेल्या सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैरान ! ऐन पेरणीच्या तोंडावर...

नांदेड जिल्ह्यात झालेल्या सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैरान ! ऐन पेरणीच्या तोंडावर बियाण्यांची चढ्या दराने विक्री

127
0

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्यात झालेल्या सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैरान ! ऐन पेरणीच्या तोंडावर बियाण्यांची चढ्या दराने विक्री

प्रतिनिधी / राजेश भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

शेतक-यांचे दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असतो व पर्जन्यमानास सुरुवात झाल्यानंतर कृषि निविष्ठा केंद्रावर खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी होते.मान्सूनचे आगमन झाले असून,शेतकऱ्यांनी पेरणींची लगबग सुरू केली आहे.मात्र,ऐन वेळी कृषी केंद्रचालकांनी बियाणे टंचाईचे जुनेच तंत्र वापरून मनमानी भाववाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मागील वर्षी नापिकी, अतिवृष्टीसारख्या विविध संकटांचा शेतकऱ्यांनी सामना केला. शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांची उगवण झाली नसल्याच्या व बोगस बियाणे निघाल्याच्या तक्रारी केल्या होत्या.यंदा मान्सूनचे आगमन बऱ्यापैकी झाल्याने पेरणीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली आहे.
सोयाबीन बियाणांची टंचाई असल्याचे कारण पुढे करून कृषी केंद्र चालक बॅगा जादा दराने म्हणजे २८०० रुपयांची बॅग ३४०० ते ४००० रुपयांनी शेतकऱ्यांना विक्री करीत आहेत. एकाच कंपनीचे बियाणे वेगवेगळ्या दरामध्ये विविध कृषी केंद्रांवर विक्री होत असल्याने शेतकरी संभ्रमात पडला आहे.शेतक-यांना भरघोस उत्पादन देणाऱ्या कंपन्यांचे बियाणे मिळणे अवघड झाले आहे.नांदेड जिल्ह्यात सगळीकडेच सोयाबीन बॅगांचा तुटवडा असल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांच्या तोंडून ऐकायला येत आहे.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे पेरणीसाठी भरवशाचे बियाणे उपलब्ध होईल आणि बियाण्यांचा माफक दरात पुरवठा होईल याची कृषी विभागाने कुठल्याही प्रकारची गॅरंटी दिली नव्हती.बियाण्याचा तुटवडा भासणार आहे असे अगोदरपासूनच सांगण्यात येत होते. यंदा पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घरचे बियाणे ठेवावे असे कृषी विभागाकडून वारंवार आवाहन करण्यात येत होते.तसेच उन्हाळ्यात सोयाबीनची पेरणी करुन बियाणे तयार करण्याचे आवाहनही करण्यात आले होते मात्र शेतकऱ्यांना ते परवडणारे नसल्याने कुणीही तसदी घेतली नाही.ऐनपेरणीच्या वेळी सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सोयाबिनचं खळं होण्याअगोदर पासूनच शेतकऱ्यांसमोर लोकांचं देनं देण्याची समस्या तोंड उघडून उभी टाकलेली असते, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी सुगीच्या वेळीच मिळेल त्या भावात सोयाबीन व्यापा-यांना विकून मोकळा होतो.या वर्षीही तसेच झाले आहे.काही मोजक्या शेतक-यांनी घरचे बियाणे ठेवल्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करावे लागत आहे.
सोयाबिनचं खळं होण्याअगोदर पासूनच शेतकऱ्यांसमोर लोकांचं देनं देण्याची समस्या तोंड उघडून उभी टाकलेली असते, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी सुगीच्या वेळीच मिळेल त्या भावात सोयाबीन व्यापा-यांना विकून मोकळा होतो.या वर्षीही तसेच झाले आहे.काही मोजक्या शेतक-यांनी घरचे बियाणे ठेवल्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करावे लागत आहे.
त्यातच बियाणे उगवण शक्तीची हमी शेतकऱ्यांवर राहील, असे लिहून घेतले जात आहे. कोरोना संकटातून उभा राहत असलेल्या शेतकऱ्यावर ऐन पेरणीच्या कालावधीत जादा दराने बियाणे विक्रीचे संकट व्यापाऱ्यांनी आणले आहे. तक्रार करण्याची तसदी घेण्यास मात्र कुणीही धजावत नसल्याने नायगाव बाजारपेठेसह तालुक्यातील कृषी केद्रावर सर्वकाही आलबेल सुरू असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर निविष्ठा वाटप,इ-कॉमर्स (ऑनलाईन विक्री पध्दतीने कमीत कमी संपर्कात शेतक-यांना निविष्ठा उपलब्ध होतील,यादृष्टीने तसे नियोजन करण्याचे आदेश २७/०४/२०२१ कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र पाठवून कळविले होते.मात्र जिल्हा,तालुका स्तरावर कुठलीच अंमलबजावणी होताना दिसत नाही.अशा स्वरुपाचे आदेश दरवर्षी निघतात पण कारमध्ये बसून एसीची हवा खात फिरणारे अधिकारी बांधावर कधी जाणार आणि शेतकऱ्यांना बांधावर कधी कृषी निविष्ठा पोहचणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा रास्त भावात मिळण्यासाठी १७ भरारी पथकांची नियुक्ती

दि.१२ मे रोजी जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्तभावात मिळण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.कृषि विभागामार्फत जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर 16 असे एकूण 17 भरारी पथके, नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे असे सांगण्यात आले होते. शेतकऱ्यांनी काही तक्रारी असल्यास जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी संतोष नादरे (मो. क्र. (8408933779 ) व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बी.बी.गिरी मो.क्र.( 9403727393 ) व तालुका स्तरावर पंचायत समितीचे तालुका कृषि अधिकारी यांना सकाळी 9.45 ते सायं 6.15 या कालावधीत संपर्क करावा असे, आवाहन नांदेडच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले होते.

या भरारी पथकांनी जिल्हा व तालुकास्तरावर वेळोवेळी कृषि निविष्ठा विक्री केंद्राना भेटी देवून तपासणी करावी. निविष्ठाकांची विक्री चढत्या भावाने होत नसल्याची खात्री करावी. नेमलेल्या भरारी पथकांनी रासायनिक खते व किटकनाशकाबाबत उगम प्रमाणपत्र तपासणीची व्यापक मोहिम राबवावी. कागदपत्रे आढळून न आल्यास विक्री बंद आदेश बजावावेत. वितरीत उत्पादक व विक्रेतेस्तरावर मुदतबाह्य निविष्ठांचा शोध घेऊन विक्री होणार नाही यांची दक्षता घ्यावी. इनव्हाईस बिल, विक्रीसाठी शिल्लक साठा, इ. पास वरील साठयांचा ताळमेळ तपासावा तफावत आढळल्यास तात्काळ कारवाई करावी. वितरकाने विक्रीसाठीच्या प्रत्येक बियाणांच्या लॉटचा किमान एम नमुना ठेवल्याची खात्री करावी. अप्रमाणित बोगस, अनाधिकृत साठयाचा शोध घेवून जप्तीची कारवाई करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते व निविष्ठा दुर्गम भागास पुरवठा करण्यात येतो. अशा कंपन्याच्या निविष्ठांचा नमुना प्राधान्याने दाखल करावा, असे निर्देश नियुक्त भरारी पथकांना देण्यात आले होते.

मात्र या भरारी पथकांनी कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन काही कृषी सेवा केद्राची माहिती घरी बसून फोनवरच सर्व काही कागदोपत्री कारभार चालू असल्याने शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या बियाण्याच्या तुटवड्याचे या अधिकाऱ्यांना काही देणे-घेणेच नाही.तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग(तालुका स्तरावरील तक्रार निवारण कक्ष प्रमुख) व तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती(तालुका स्तरावरील भरारी पथक प्रमुख) या दोन्ही जबाबदार अधिका-याकडे तालुक्यातील कृषी सेवा केंद्राच्या नावाची व फोन नंबरची प्रिंटेड यादी नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.तसेच तालुक्यातील कुठल्याही कृषी सेवा केंद्र चालकाने भाव फलक व कृषी निविष्ठा उपलब्ध असल्याचे फलक कृषी केंद्राच्या दर्शनीभागी लावल्याचे कृषी अधिकारी यांना कसे दिसत नाही, याबाबत एकाही केंद्र चालकावर कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत नाही.
जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी(जिल्हा स्तरावरील भरारी पथक प्रमुख) यांचा फोन शनिवारी व रविवारी स्विच ऑफ होता.कुठे दौऱ्यावर होते कुणास ठाऊक?

बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक औषधीबाबत

प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार निवारण कक्ष येथे नोंदवावी

दि.18 जून रोजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक औषधीबाबत तक्रार असल्यास तालुका स्तरावर तालुका तक्रार निवारण कक्ष, तालुका कृषि अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण कक्षास तक्रार नोंदवावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या होत्या.
जिल्ह्यातील मुख्य बियाणे वितरक व कंपनी प्रतिनिधी यांच्यासमवेत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी बियाणे पुरवठा प्रती बॅग किंमतीबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना, शेतकऱ्यांना बियाणे दराबाबत अडचण येणार नाही व जादा दराने विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी, कृषि विकास अधिकारी, जिल्ह्यातील मुख्य कृषि सेवा केंद्रधारक, कंपनी प्रतिनिधी तसेच प्रभारी मोहिम अधिकारी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here