Home नांदेड कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राहेरच्या हरणाळा शिवारातील वांग्याच्या फडात शेतकऱ्यानी फुलविलेल्या...

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राहेरच्या हरणाळा शिवारातील वांग्याच्या फडात शेतकऱ्यानी फुलविलेल्या गांज्याची पिकात स्था.गु.शा.ने टाकली धाड

187
0

राजेंद्र पाटील राऊत

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राहेरच्या हरणाळा शिवारातील वांग्याच्या फडात शेतकऱ्यानी फुलविलेल्या गांज्याची पिकात स्था.गु.शा.ने टाकली धाड

प्रतिनिधी / राजेश भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या राहेर येथील एका शेतकऱ्यानी हरणाळा शिवारात असलेल्या आपल्या शेतातील वांग्याच्या व झेंडूच्या झाडा मध्ये आपली तीन गुंट्याच्या रानात कोणाला ही अंदाज अथवा माहिती मिळू नये म्हणून शेतकऱ्यानी शेतात हिरव्यागार गांज्याच्या झाडाची लागवड करून एक प्रकारचा मळाच फुलावीला असल्याची नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याला मिळाल्याने घटनास्थळी जाऊन गांज्याचे ताब्यात घेतले आहे

तालुक्यातील राहेर हे गाव कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असले तरी हरणाळा हे गाव बिलोली तालुक्यातील असून ही शेती शेतकऱ्यांने हरनाळा शिवारातील शेतीमध्ये वांग्याच्या व झेंडूच्या बरोबरीने गांजाची लागवड केली असावी सदरची देण्यात आलेली माहिती गोपनीय ठेवण्यत असून अधिकाऱ्यानी मोठी गोपनीयता बाळागून धाड मारली नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक २२ जुन २०२१ रोजी म्हणजे मंगळवारी ठीक २ वाजण्याच्या दरम्यानची ही सदरची घटना आहे

राहेर येथील शेतकरी हा गांज्याची लागवड शेतात केला होता त्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून ६२ किलो वजनाची अंदाजी किंमत जवळ पास तीन लाखाच्या वर असल्यामुळे गांज्याची झाडे जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणी कुंटुर पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करन्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिस प्रशासना कडून मिळाली आहे.

नायगाव तालुक्यातील राहेर येथील शेतकरी बळीराम गंगाराम घोरपडे यांचे बिलोली तालुक्यातील हरनाळा येथे शेती आहे. कुंटुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हरनाळा परिसरात असलेल्या गट नंबर ३६ मधील शेतात वांग्याचे पिक घेतले. पण या वांग्याच्या पिकात गांज्याच्या झाडाची लागवड या शेतकऱ्याने केली. सदरची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांच्या पथकाने (ता. २२) रोजी सकाळी हरनाळा शिवारातील शेतात धाड मारली. यावेळी वांग्याच्या पिकात कुठलीही परवानगी न घेता गांज्याची ३८ झाडे लावल्याचे दिसून आले.

कुष्णुर च्या जुगार आड्यावर धाड या नंतर अवैध देशी दारू जप्त व आता कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची लागवड ही स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्याच्या घटना एका मागे एक घडत आहेत.राहेर,बरबडा, कुष्णुर, व गोदाकाठावर च्या गावात अनेक अवैध धंदे बोकाळले असून या वर नियंत्रण करण्या साठी पोलीस प्रशासनाने कडक पाऊल उचलावीत अशी भावना सर्व सामन्यातून व्यक्त होत आहे. पठाण यांच्या फौजदार दिनेश येवले यांच्यासह पोलिसांनी धाड कालपरवाच मारले असले तरी.कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राहेरच्या शेतकऱ्यानी हरणाळा शिवारात वांग्याच्या फडात फुलविली गांज्याची शेती असे चित्र दिसून आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here