Home गडचिरोली कोणसरी प्रकल्पामध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देऊन तेथील शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा आमदार...

कोणसरी प्रकल्पामध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देऊन तेथील शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230522-WA0026.jpg

कोणसरी प्रकल्पामध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देऊन तेथील शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)-
स्थानिकांना सामावून घ्यावे याकरिता स्थानीक युवकांचे आ. डॉ.देवरावजी होळी यांना निवेदन

स्थानीक युवकांच्या आंदोलनामध्ये आ. डॉ.देवरावजी होळी सहभागी होणार

सुरजागड लोह प्रकल्पातून तयार होणाऱ्या कोnuसरी पोलाद कारखान्यामध्ये स्थानिक लोकांना नौकरी मिळावी याकरिता वारंवार मागणी करूनही सुरजागड व कोणसरीचे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक युवक कंपनीच्या विरोधामध्ये मोठे आंदोलन करणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाच्या पूर्वीच स्थानिकांना सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करावी व या युवकांच्या मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी केली असून असे न केल्यास आपणही या तरुण युवकांच्या आंदोलनात सहभागी होऊ असा इशारा त्यांनी कोणसरी पोलाद प्रकल्प कंपनीला दिलेला आहे .
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना याबाबतचे निवेदन स्थानिक युवकानी दिले. यावेळी निवेदन देताना जितेंद्र हुलके सरपंच ग्रामपंचायत कढोली, वसंत चौधरी उपसरपंच अनखोडा ,पवन रामगिरीवार आष्टी, , नेमाजी घोगरे गडचिरोली , हरेश निखाडे माजी उपसरपंच जयरामपूर ,संदीपभाऊ तिवाडे आष्टी, राहुल कुमरे उमरी यांचेसह युवक उपस्थित होते.

यावेळी निवेदनामध्ये परिसरातील स्थानिक युवक बेरोजगारांना प्राधान्य देण्यात यावे, जमिनीची अधिग्रहण प्रक्रिया पार पाडताना जमीन मालकांची मध्यस्था मार्फत चर्चा न करता थेट चर्चा करण्यात यावी, अधिग्रहण करण्यात येणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला देण्यात यावा, या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना तुटपुंजे वेतन न देता पगारवाढ करण्यात यावी ,दिशाभूल व फसवणूक करून जमीन अधिग्रहण करू नये या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केल्या. तसेच १५ दिवसाच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी सुरजागड लोह प्रकल्प व कोणसरी पोलाद कारखान्याच्या प्रशासनाला दिलेला आहे.

Previous articleकर्नाटक निवडणुकीत जनताच सर्वोपरि आहे
Next articleजागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त जनजागृती मेळावा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here