• Home
  • पोलीसदादा आले आणि गाव बंद करून गेले..काही क्षणात तालुका लॅाक..! व्यापाऱ्यांकडून विरोध, सरकारचा निषेध..🛑

पोलीसदादा आले आणि गाव बंद करून गेले..काही क्षणात तालुका लॅाक..! व्यापाऱ्यांकडून विरोध, सरकारचा निषेध..🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210407-WA0100.jpg

🛑 पोलीसदादा आले आणि गाव बंद करून गेले..काही क्षणात तालुका लॅाक..! व्यापाऱ्यांकडून विरोध, सरकारचा निषेध..🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

दौंड :⭕ पुणे. जिल्हाधिकारी साहेबांचा सकाळी सकाळी आदेश आला. येत्या 30 एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता लॅाकडाऊन करा. आणि पोलीसदादा गावात फिरू लागले दुकाने बंद करा.. आणि काही क्षणात दौंड तालुक्यातील गाव बंद झाली. अचानक बंद करायला सांगितल्याने छोट्या मोठ्या दुकानदारांची धावपळ उडाली. सरकराने अचानक जाहीर केलेल्या या लॅाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील छोट्या व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. व्यापारी संघाकडून शासानाच्या आदेशाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकार क्षणाक्षणाला वेगवेगळे निर्णय घेत आहे. यामुळे रोज बदलणारा निर्णय आणि आदेशांमुळे व्यापारी वर्गसह सर्वसामान्य जनता संभ्रमात पडली आहे. शासनाने एकदाच काय असेल तो निर्णय घ्यावा, एकतर सगळेच बंद करा, नाहीतर सगळे चालू तरी करा, अशा संतापजनक प्रतिक्रीया ग्रामीण भागातून येऊ लागल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांनी 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश जारी केला. या आदेशाची त्वरीत आमंलबाजवणी तालुका आणि गावस्तरावर स्थानिक प्रशासनाने सुरू केली. आज दुपारी यवत पोलीसांनी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये जाऊन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याच्या सुचना दिल्या. यावरून काही ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि व्यापारी यांच्या शाब्दिक वादही झाले. मात्र शासनाच्या आदेशाचे पालन करावे लागणार असल्याने अनेकांनी विरोध न करता दुकाने बंद करण्यास सुरवात केली.
तालुक्यातील पाटस, वरवंड, केडगाव, यवत, चौफुला, पारगाव, राहु, खुटबाब, भांडगाव यासह इतर गावांमध्ये काही वेळातच दुपारनंतर शुकशुकाट झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, पाटस व्यापारी संघाचे अध्यक्ष गणेश जाधव म्हणाले की, शासनाने जारी केलेल्या आदेशाचा आम्ही निषेध करतो. अचानक बंद केल्याने ग्रामिण भागातील छोटे हॅाटेल व इतर व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची भरपाई कोण देणार ? शासनाने एकतर सर्वच बंद करून पुर्ण लॅाकडाऊन करावा, असा अर्धवट लॅाकडाऊन करून शासनाला काय सिध्द करायचे आहे? गोरगरीबांची आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांची दुकाने बंद करून कोरोना जाणार आहे का ?
शासनाने कडक निर्बंध व नियम घालावीत ती पाळत नसेल, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. मात्र या निर्णयांमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याचा विचार शासनाने करावा.

यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील म्हणाले की , शासनाचे आदेश आल्याने आम्ही यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये जाऊन त्यांना समजावून सांगून बंद करण्याचे आवाहन करत आहोत.

व्यापारी वर्गाने शासनाचे आदेशाचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणावर कायदेशीर कारवाई केली जाईल.⭕

anews Banner

Leave A Comment