Home माझं गाव माझं गा-हाणं सटाणा तालुक्यात अंगणवाडी विद्यार्थ्यांचा पोषण आहार गायब खळबळ

सटाणा तालुक्यात अंगणवाडी विद्यार्थ्यांचा पोषण आहार गायब खळबळ

291
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा, (शशिकांत पवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

बागलाण तालुक्यातील
पिंपळदर येथे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या रिकाम्या पिशव्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.
पिंपळदर येथील भगवान पवार हे नेहमी प्रमाणे आपल्या शेतात गेले असता त्यांना त्यांच्या शेताच्या लगत रस्त्याच्या कडेला काहीतरी गोणीन मध्ये काहीतरी भरल्याचे दिसले कुतूहलाने त्यांनी ते पाहिले असता त्यांना त्याच्या मध्ये अंगणवाडी मधील लहान बालके, गरोदर माता, यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार च्या रिकाम्या पिशव्या आढळल्या. अंगणवाडी मधील बालके,गरोदर माता ,स्तनदा माता यांना कुपोषणापासून सुदृढता येण्याच्या दृष्टिकोनातून सदरील पोषण आहार दिला जातो त्यात प्रामुख्याने चना, मसूर डाळ, चवळी ,गहू, साखर, मीठ व हळद इत्यादी साहित्य दिले जाते .पोषण आहार संबंधित लाभार्थ्यांना देऊन लाभार्थी रजिस्टरवर पालकांची किंवा लाभार्थ्यां च्या सह्या करून लाभार्थ्यांना पुरवला जातो परंतु अशा या पोषण आहाराच्या रिकाम्या पिशव्या रस्त्याच्या कडेला आढळल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे . जिल्हास्तरावरुन प्रयेक तालुक्यात ठेकेदार हा पोषण आहार प्रत्येक अंगणवाडीत पोहच केला जातो . त्यानंतर अंगणवाडी माध्यमातून हा पोषण आहार लाभार्थ्यांना वाटप केला जातो मग हया एवढ्या पोषण आहाराच्या पिशव्या नक्की कोणी टाकल्या व त्यातील माल नक्की कोणी हडप केला? याबाबत अनेक शंका निर्माण होऊन या पोषण आहार घोटाळ्याचे गुढ काय ? नक्की ठेकेदारांनी हा प्रताप केला का एखाद्या दुर्गम भागातील अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांनी केला . त्याचा शहानिशा होऊन या प्रकरणातील बालकांच्या आणि गरोदर मातांच्या तोंडातील पोषण आहार हिसकावणाऱ्यानाअद्दल घडवून कठोर शिक्षा करावी व या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करावी , याचा खरा सुत्रधार कोण? कोरोना सारख्या महामारी च्या काळात घेतलेला गैरफायदा म्हणावा लागेल. हा पोषण आहार लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता परस्पर या मालाची विल्हेवाट लावण्याचे दिसते.
याबाबत तात्काळ भगवान पवार यांनी सरपंच संदीप पवार व ग्रामसेविका एस आर सूर्यवंशी, पोलीस पाटील शरद बागुल यांना दूरध्वनी द्वारे माहिती देऊन त्याठिकाणी बोलावले नागरिक व पदाधिकारी समक्ष पंचनामा करून सरपंच संदीप पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यां सोबत दूरध्वनी वरून संपर्क साधला
व झालेला सर्व प्रकार सांगितला तसेचअसे दुष्कृत्य करणाऱ्या दोषींना कठोर शिक्षा व्हावीअशी मागणी त्यांनी केली.

_” लहान बालके गरोदर माता यांच्यासारख्या लाभार्थ्यांच्या तोंडातून पोषण आहार पळणाऱ्या दोषींना कठोर शासन व्हावे अशी अपेक्षा असून वरिष्ठांची देखील मी याबाबत बोललो आहे”._

संदीप पवार ,सरपंच पिंपळदर

Previous articleब्रिटनमध्ये सापडला नवीन विषाणू:मंकीपॉक्स
Next articleमहालपाटणे ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांचे विविध विकास कामाबाबत खासदार डाँ.भारती पवार यांना साकडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here