Home माझं गाव माझं गा-हाणं महालपाटणे ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांचे विविध विकास कामाबाबत खासदार डाँ.भारती पवार यांना साकडे

महालपाटणे ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांचे विविध विकास कामाबाबत खासदार डाँ.भारती पवार यांना साकडे

133
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा — (शशिकांत पवार मराठा युवा मराठा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सटाणा}
ग्रामपंचायत महालपाटणे येथील ग्रामपंचायत शिष्टमंडळ ,ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी खासदार डॉ.भारती ताई पवार यांची सदिच्छा भेट घेऊन विविधविकासकामांबाबत चर्चा करून निवेदन दिले.
यात प्रामुख्याने ब्राह्मणगाव ते महालपाटणे या दोन गावांना जोडणाऱ्या गिरणा नदीवर पूलाची मागणी करून यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत चर्चा करण्यात आली जर हा पूल झाला तर नागरिकांना लखमापूर निंबाळा मार्गे फिरून जाण्याचा मोठा फेरा वाचणार आहे त्यामुळे बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील उमराणे मार्केट साठी जाण्यासाठी, व दळवळणाच्या दृष्टीने मोठा शॉर्टकट रस्ता निर्माण होईल यासाठी निधी उपलब्ध करणे बाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॉ.भारती पवार यांनी दिले,तसेच आमदारसाहेब व जिल्हा परिषदसदस्या यांच्या माध्यमातून गाव अंतर्गत येणारे रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्र, शिवार पांदण रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून, देण्याचे आश्वासन दिले.
सबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी स्वतः डॉ. भारती पवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून सदर कामाबाबत पाठपुरावा करुन सदरील प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच योगेश अहिरे, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य तुषार काका कुलकर्णी, किरण अहिरे , भाऊसाहेब आहिरे ,चिकू दादा अहिरे आदी सदस्य उपस्थित होते.

Previous articleसटाणा तालुक्यात अंगणवाडी विद्यार्थ्यांचा पोषण आहार गायब खळबळ
Next articleओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here