राजेंद्र पाटील राऊत
रामतीर्थ येथील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष हनमंत पाटील वाडेकर यांच्या वतीने बुजविण्यात आले रस्त्यातील खड्डे.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
रामतीर्थ येथील नवोदय विद्यालय वामन नगर,तसेच जून्या गावातील वेशी मधील रस्ता अतिशय खराब झाल्याने रहदारीस व पायी चालत येणाऱ्या पादचारी यांना अतिशय त्रास होत होता. या रस्त्यावर मुरूम टाकून खडे बुजवण्यात आले. यावेळी हनमंत पाटील वाडेकर जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड,व्हाईस चेअरमन सेवा सहकारी सोसायटी तथा ग्रामपंचायत सदस्य, गुणवंत पाटील चंदने,बालाजी पाटील पुयड,विठ्ठलराव गूरूजी,मारोती पा रोकडे,प्रकाश पा रोकडे,संजय पा पूयड,दिलीप रोकडे आदि जण यावेळी उपस्थित होते.