Home नांदेड होनवडज येथील छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक श्री मारोती खतगावे सेवानिवृत्त !

होनवडज येथील छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक श्री मारोती खतगावे सेवानिवृत्त !

185
0

राजेंद्र पाटील राऊत

होनवडज येथील छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक श्री मारोती खतगावे सेवानिवृत्त !
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील होनवडज येथील छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक श्री मारोती विठ्ठलराव खतगावे हे 27 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले आहेत.
तालुक्यातील होनवडज येथील छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून मारोती विठ्ठलराव खतगावे हे 1994 ला रुजू झाले होते.
एक विद्यार्थीप्रिय आणि शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा विद्यालयांमध्ये नावलौकिक होता आपल्या सेवेतील एकूण 27 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी आपल्या विषयाच्या अध्यापन बरोबरच इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदविला होता जिल्हा शिक्षण मंडळ ,मराठवाडा शिक्षक संघ आदि शिक्षक संघटनांच्या चळवळीमध्ये त्यांनी आपले महत्वपूर्ण असे योगदान दिले नियत वयोमानाप्रमाणे श्री मारोती विठ्ठलराव खतगावे हे आज आपल्या प्रदीर्घ अशा 27 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री गोविंदराव जाधव मुख्याध्यापक शंकरराव वानखेडे आदींनी त्यांचा यथोचित सत्कार करुन सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत .मारोती खतगावे यांना सेवानिवृत्तीनिमित्त गावातील नागनाथराव पाटील, बालाजीराव जाधव, व्यंकटराव जाधव ,गंगाधरराव पाटील, रमेश पाटील पाळेकर, प्राध्यापक तथा पत्रकार यशवंत बोडके, आर. बी. जाधव तग्याळकर तसेच सहकारी शिक्षक वृंद आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here