राजेंद्र पाटील राऊत
नवे निरपूरचे सरपंच शरद [मुन्ना दादा ] सूर्यवंशी व माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी पंचक्रोशीत कोरोंनाग्रस्तांसाठी देवमाणूस म्हणून जनतेत नावलौकीकास प्राप्त..!!
सटाणा,(शशिकांत पवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
कोरोंना पॉजिटिव हा शब्द कानी पडला तरी अंगावर शाहरे उभे राहतात . आज जगात सगळीकडे या आजाराने सगळे हतबल असून दिल्ली पासून गल्ली पर्यंत कडून सर्वोतोपरी या आजारासाठी उपाययोजना सुरू असून देखील या आजाराचा कहर सर्वत्र आहे .या शासन यंत्रणावर अवलंबून न रहाता आपणच स्वत; काही तरी केले पाहिजे या भावनेने प्रेरित होऊन समाजाचे काही तरी देणे लागतो म्हणून निरपूर सरपंच मुन्ना सूर्यवंशी व माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी या कोरोंना अजारासारख्या महाभयंकर आजाराला न घाबरता बिनधास्तपने गावातील व पंचक्रोशीतील कोणालाही काही तब्बेतीचा त्रास झाला की लोक या दोघांना फोन करतात आणि त्या रूग्णाला हे दोघीजण आपल्या गाडीत बसवून दवाखान्यात घेऊन जातात.
कोरोंनाची तपासणी करण्या पासून तर आवशक्ता असणार्या रूग्णाला दवाखान्यात तर घेऊनच जातात त्या रुग्णाला रक्त, प्लाजमा व ऑक्सिजन ची देखील उपलबद्धता करून देतात.या कोरोना रुग्णांसाठी व या आजाराबाबत जंनजागृती व मदती साठी यांनी सोशल मीडिया व्हाटसअप वर एक मित्र परिवाराचा ग्रुप तयार केला असून वरील सर्व मदत या ग्रुप च्या माध्यमातून केली जाते . कुणालाही काही मदत लागली तर या ग्रुप च्या कार्यकर्त्यांचा माध्यमातून या दोघांपर्यंत संदेश येतात तात्काळ मदती साठी हजर होतात, त्यांच्या मुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत . एवढेच नव्हे तर ज्या कोरोंना आजाराने कुणी मृत्यू पावले तर सखे जवळ चे नातेवाईक देखील अंत्यविधीला येत नाहीत किंवा येण्यास घाबरतात त्या ठिकाणी हे दोघी अंत्यविधीला हजर राहून सर्व सोपस्कार स्वत; करतात हे विशेष आहे .
त्यांच्या या कार्य मुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांना “देवमाणूस” ही कौतुकास्पद पदवी दिली असून मित्र मंडळीने तर यांचा मोबाइल वर डीपी देवमाणूस म्हणून ठेवला आहे त्यांची ही लोकांनी दिलेली पदवी खरच त्यांच्या या धाडशी कार्याला नुसार त्यांना साजेशी आहे . अशा या कोरोंना योद्धत तन मन व धनाने धाऊन जाणार्या देवमानसाणना युवा मराठा न्यूज चॅनलचा माना चा सलाम !
शशिकांत पवार ,सटाणा प्रतिंनिधी