Home नांदेड कोरोना लाॅकडाऊनमुळे शेतकरी सापडला संकटात पैसे अभावी शेतीचे काम खोळंबली,जून महिणा जवळ...

कोरोना लाॅकडाऊनमुळे शेतकरी सापडला संकटात पैसे अभावी शेतीचे काम खोळंबली,जून महिणा जवळ आला तरी खत बी बियाणे साठी पैसे नाहीत

193
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना लाॅकडाऊनमुळे शेतकरी सापडला संकटात

पैसे अभावी शेतीचे काम खोळंबली,जून महिणा जवळ आला तरी खत बी बियाणे साठी पैसे नाहीत

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

गेल्या १ वर्षा पांसुन मुखेड तालुक्यातील शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे.अगोदरच डोक्यावर कोरोनाच संकट असल्याने अनेकदा लाॅकडाऊन ही करण्यात आले.त्यामुळे काम धंदा रोजगार बंद असल्याने पैशाची कणकण भासू लागली. त्याच बरोबर गेल्या वर्षी बाजारात विक्रीसाठी आलेल्या बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र निर्सगाच्या अवकृपेने जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.त्यामुळे शेतीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले.मुग , उडिद, सोयाबिन शेतात मोड उठून पडले होते.तर अनेक नदी,तलावाच्या काठचे जमिनी ही पूराच्या पाण्यात खरडून गेले बांध फुटूण गेले.त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते.

शेतीची मशागत व दुरूस्ती करण्यासाठी पैसे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.मात्र राज्यात परत लाॅकडाऊन लागल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. आज पर्यंत बँके कडून कधीच कर्ज न घेतलेला शेतकरी यावर्षी पैसे नसल्याने पहिल्यांदाच बँके कडे पिक कर्जाचे प्रस्ताव दिला.मात्र आज आठ महिने झाले.तरी नविन पिक कर्ज धारक शेतकऱ्यांना बँकेने कर्ज मंजूर केले नाही.त्यामुळे मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथील स्टेट् बँक ऑफ इडिया या बँकेत नविन पिक कर्जासाठी प्रस्ताव पाठवलेल्या अनेक शेतकऱ्यांचे पिक कर्जाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.त्यामुळे येथील बँकेने तात्काळ शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर करून द्यावे.अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.कारण जून महिणा जवळ आला तरी शेतीचे कामे पुर्ण झाले नाहीत.पेरणी साठी लागणारे खत बी बियाणे आणण्यासाठी जवळ पैसे नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.जर बँकेने पिक कर्ज मंजूर करून दिले तर शेतकऱ्यांचे मशागतीचे कामे पुर्ण होतील.तसेच खत बी बियाणे आणण्यासाठी ही शेतकऱ्यांना मदत होईल.अन्यथा शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढून शेतीचे कामे करावी लागतील. त्यामुळे शेतकरी सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकतील आणि परत आत्महत्या सारखे प्रकार घडतील. त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटनकर यांनी याकडे लक्ष देऊन येथील नविन पिक कर्ज धारक शेतकऱ्यांना न्याय द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.गेल्या आठ महिण्या पांसुन येथील शेतकरी कर्ज मागणी करत आहेत.मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी नांदेड जिल्ह्यात कोणी लोकप्रतिनिधीच उरला नाही का हा प्रश्न आत्ता सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

Previous articleमाधव शंकरराव पा.कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्र.4 मध्ये विविध समाज उपयोगी साहित्य वाटपाचा उपक्रम!
Next articleमुखेड येथे मराठा समाजाच्या युवकांनी केले सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here