Home नांदेड मुखेड येथे मराठा समाजाच्या युवकांनी केले सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन..

मुखेड येथे मराठा समाजाच्या युवकांनी केले सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन..

177
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड येथे मराठा समाजाच्या युवकांनी केले सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
सर्वोच्च न्यायालयाने काल मराठा समाजाच्या आरक्षणास रद्दबातल केल्याने मुखेड तालुक्यातील मराठा समाजाच्या युवकांनी केंद्र व राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवत मुखेड चे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांच्याकडे निवेदन देऊन संविधानिक मार्गाने सरकारकडे निषेध नोंदविण्यात आला आहे. यावेळी शिव शंकर पाटील कलंबरकर, सचिन पाटील इंगोले, गिरीधर पाटील केरूरकर, गोपाल पाटील जाहूरकर, आकाश पाटील केरूरकर, विनायक पाटील माहेगावकर, प्रदीप पाटील हसनाळकर, बालाजी पाटील वडजे, सुमित इंगोले, चंद्रकांत वडजे, तानाजी इंगोले, प्रशांत पाटील, धनाजी इंगोले, सतीश शिंदे यांच्यासह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here