Home नाशिक ठेंगोडा येथे आज पोलिस अधिकाऱ्यांचा नागरी सत्कार

ठेंगोडा येथे आज पोलिस अधिकाऱ्यांचा नागरी सत्कार

312

राजेंद्र पाटील राऊत

ठेंगोडा येथे आज पोलिस
अधिकाऱ्यांचा नागरी सत्कार
(गणेश पगारे युवा मराठा न्युज)
ठेंगोडा-सटाणा तालुक्यातल्या ठेंगोडा गावी आज नाशिकचे पोलिस आयुक्त व ए.सी.पी.या पोलिस अधिकाऱ्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ठेंगोडयाचे सरपंच सौ.चिंधाताई पगारे व उपसरपंच नारायण निकम यांनी दिली.
ठेंगोडा येथील सिध्दीविनायक गणेश मंदिराच्या प्रांगणात हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे,नाशिकचे पोलिस आयुक्त दिपक पांडे आणि वसंत मोरे ए. सी.पी.यांनी पोलिस क्षेत्रात कार्यरत राहूनही विधायक व सामाजिक कार्यात मोठे योगदान दिलेले असून,त्याशिवाय आपल्या पोलिस सेवेचा कर्तृत्व कर्तबगारीचा ठसा जनसामान्यांमध्ये उमटविलेला असल्याने,त्यानिमिताने या नागरी सत्कार सोहळ्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच सौ.पगारे व उपसरपंच निकम यांनी केले आहे.

Previous articleगुत्तेदाराकडुन बिहारीपुर ते वळंकी रस्त्याचे काम निकृष्ठ,असेच काम सुरू राहिल्यास स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने दिला उपोषणाचा इशारा…
Next articleमहावितरण चा कारभार, दिव्याखालीच अंधार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.