Home कोकण दाभीळ मोरेवाडीचा आधारवड हरपला 🛑

दाभीळ मोरेवाडीचा आधारवड हरपला 🛑

114
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 दाभीळ मोरेवाडीचा आधारवड हरपला 🛑
✍️ दापोली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

दापोली :⭕कै.शांताराम मोरे यांच्या निधनाने दाभीळ गावावर शोककळा

दापोली तालुक्यापासून ३५ किमी अंतरावर असणाऱ्या दाभीळ मोरेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते, सदगुरु सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष, एक उत्तम प्रगतशील अभ्यासू शेतकरी,अनेकांचे मार्गदर्शक आधारस्तंभ कै.शांताराम महादू मोरे यांची वयाच्या ७० व्या वर्षी दि.२८ एप्रिल २०२१ रोजी प्राणज्योत मावळल्याने त्यांच्या निधनाची बातमी ऐकून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

जीवनात जो स्वतःसाठी जगतो त्याला मरण येते आणि जो सदैव दुसऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचतो तो अमर राहतो. ज्या समाजाने आपल्याला भरभरुन दिले त्या समाजासाठी त्यांच्या हाताची ओंजळ कायमच खुली असायची. मग ते सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व इतर कोणतेही क्षेत्र असो. वाडीचा सर्वांगीण विकास,समाजाची उन्नती हे त्यांचे ध्येय त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. स्पष्टवक्ते, दूरदृष्टी, प्रचंड मेहनत, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद व दुसऱ्याच्या दुःखात आपला दुःख समजून सर्वांना सोबत पुढे घेऊन जाण्याची आणि समाजासाठी काहितरी करण्याची प्रामाणिक तळमळ हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष पैलू होते.
ते उत्तम प्रगतशील शेतकरी असल्याने शेतीतून विविध फूल व फळभाज्या घ्यायचे व अत्यंत स्वस्त भावात त्याची विक्री करायचे.

भात,नाचणी,वरी,जोंधळा नारळ, सुपारीच्या बागांबरोबर हंगामानुसार भुईमूग,रताळी, वांगी,मिरची,टॉमेटो सारखी पिके ते दरवर्षी घेत असत. याशिवाय नवीन घरे बांधणे,चिऱ्याचे कोरीव काम करणे,बांबूच्या झाडांपासून टोपल्या, डालगे,नदीची खेकडी पकडण्यासाठी गडदे व मासे पकडण्यासाठी कोईन बनवण्याची उत्तम कला त्यांना अवगत होती.जनावरांवर आयुर्वेदिक औषध उपचार करणे,मंडप डेकोरेट,लाईटिंग तसेच साऊंड सर्व्हिस व्यवसाय ऑर्डर प्रमाणे करत असत.

सिझन प्रमाणे हापूस आंबा,काजूची विक्री मुंबई,पुणे अन्य शहरात ते दरवर्षी करायचे.
साधा सरळ स्वभाव, शांत संयमी पण तितकेच आक्रमक,नेहमी वाडीच्या भल्यासाठी अहोरात्र झटणारे हाडाचे कार्यकर्ते,अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय शांताराम मोरे होय.
याशिवाय ते एक उत्तम कलाकार देखील होते. तमाशामध्ये ते विविध अभिनय करुन लोकांना अक्षरशः पोटधरुन हसवत असत. अनेक वर्षे त्यांनी श्री सद्गुरू सेवा मंडळ दाभीळ मोरेवाडी ग्रामीण विभागाच्या अध्यक्ष पदाची धुरा अगदी यशस्वीरीत्या सांभाळली असून गाव व समाजपातळीवर देखील त्यांचे योगदान प्रचंड आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली वाडीमध्ये विविध विकासकामे आली. फणसू ते मोरेवाडी गाडी रस्ता डांबरीकरणासाठी त्यांचे योगदान प्रचंड असून ते सर्वश्रुत आहे. वाडीमध्ये पाणी व्यवस्था असो अथवा छोट्या मोठ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष टाकून ते वाडीची आणि वाडीतील सर्व मंडळींची एक कुटुंबप्रमुख म्हणून काळजी घेत असत.

बाबांचे शिक्षण खूप कमी होते पण अनुभव दांडगा असल्याने शिक्षित देखील त्यांच्यासमोर नम्रपणे असायचे. एवढा धाक,दरारा,वचक तेवढेच प्रेम आपुलकी असायची.पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारा, दुःखात कोलमडून जाता पुन्हा उभे करणारा तुमचा आमचा आधारवड आज उन्मळून पडल्याचे तीव्र दुःख होत आहे.
जिद्द, चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, खडतर परिश्रम या पंच सुत्रावर प्रतिकूल परिस्थिती वाडीसाठी,समाजासाठी धर्याने लढणारा लढवय्या आज काळाच्या पडद्याआड कायमचा झाला आहे.

बाबा पुनश्च आपल्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली वाहतो. ते डायलिसिस पेशंट होते त्यांच्या मागे पत्नी,दोन विवाहित मुले,चार विवाहित मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.शून्यामधूनी विश्व निर्मूनी,कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ,माया,प्रिती देऊनी,सत्य सचोटी मार्ग दावूनी ,
अमर झाला तुम्ही जीवनी..
बाबा तुमच्या अनेक आठवणी आमच्या अंतकरणात सदैव चिरंतर राहतील. ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here