Home Breaking News हिंगोली येथील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याचा अखेर दुर्दैवी मृत्यू – पोलिस अधिक्षकांकडे केली...

हिंगोली येथील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याचा अखेर दुर्दैवी मृत्यू – पोलिस अधिक्षकांकडे केली होती मदतीची याचना

185
0

राजेंद्र पाटील राऊत

हिंगोली येथील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याचा अखेर दुर्दैवी मृत्यू – पोलिस अधिक्षकांकडे केली होती मदतीची याचना

राजेश एन भांगे

कोरोनाने हतबल झालेल्या हिंगोलीतील पोलीस कर्मचाऱ्याने अशी आपली एक ऑडिओ क्लिप केली होती.
त्या कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू झाला.

थेट पोलीस अधीक्षकांना उद्देशून केलेल्या या क्लिपमध्ये त्याने वेळेवर उपचार मिळत नसल्याचंही सांगितलं होतं.

हिंगोली येथील गोरेगाव पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या सचिन इंगोले यांना अस्थमाचा त्रास होता.
त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली.
त्यांची आई आणि वडील यांनाही कोरोना झाला होता.
मात्र त्यांना उपचार व्यवस्थित मिळत नव्हते.
त्यामुळे हतबल होऊन इंगोले यांनी थेट पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना उद्देशून एक ऑडिओ क्लिप केली होती,
ज्यात त्यांनी आपल्या परिस्थितीचे कथन केलं.
वारंवार मदतीसाठी कॉल करूनही उपचारासाठी काहीही हालचाली होत नसल्याने थेट छतावरून उडी मारून आत्महत्या करतोय असे इंगोले यांनी सांगितलं होतं.
त्यांची ती ऑडिओ क्लिप चांगलीच वायरल झाली होती.
अखेर त्यांचा (कोरोना ) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे फ्रंटलाईन कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची अवस्था काय आहे ?
हे दिसून येतंय.
त्यांना आम्ही तात्काळ आय.सी.यू.मध्ये दाखल केलं होतं परंतु अस्थमाचा त्रास असल्याने त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या वडिलांच्या उपचाराकडे आम्ही लक्ष देत आहोत,
पण दुर्दैवाने आम्ही आमच्या कर्मचाऱ्याला वाचवू शकलो नाही अशी प्रतिक्रिया हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासगर यांनी दिलीय.

Previous articleजाहुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सहात साजरी….
Next articleखासदार विखेंना जिल्हाधिकारीच पाठीशी घालत आहेत – न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here