Home कोल्हापूर करवीर तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटर साहित्यात कोणताही गैरप्रकार नाही 

करवीर तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटर साहित्यात कोणताही गैरप्रकार नाही 

93
0

कोल्हापूर : यापुर्वी बंद करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य जवळच्या आरोग्य उपकेंद्रात ठेवण्यात आले होते. राजर्षि छ. शाहू विद्यानिकेतन शिंगणापूर येथे कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य बालिंगा येथील आरोग्य उपकेंद्रात ठेवण्यात आले होते. त्यामुळे हे सर्व साहित्य कोव्हिड केअर सेंटरचे आहे. यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही. त्यामुळे कोव्हिड केअर सेंटरवरील साहित्यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही असे स्पष्टीकरण करवीर पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिले आहे.
करवीर तालुक्यात कोव्हिड-19 चे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने मागील वर्षी राजर्षि छ. शाहू विद्यानिकेतन, के. आय.डी. कॉलेज बॉईज होस्टेल गो. शिरगांव, भोगावती महाविद्यालय कुरुकली, डी.सी.नरके विद्यानिकेतन कुडीत्रे येथे कोव्हिड केअर सेंटर चालू करण्यात आले होते. डिसेंबर नंतर कोव्हिड-19 रुग्णांचे प्रमाण कमी आल्यानंतर टप्प्याटप्याने कोव्हिड केअर सेंटर बंद करण्यात आले संबंधित सर्व ठिकाणी विद्यार्थ्याचे वसतिगृह असल्याने कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य रिकामे करणे आवश्यक होते. बंद करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य करवीर तालुक्यातील जवळच्या प्रा.आ. केंद्र व उपकेंद्र याठिकाणी ठेवण्यात आले होते जेणेकरुन भविष्यात पुन्हा कोव्हिडची लाट आल्यास कोव्हिड सेंटर चालू करता येईल, असेही तालुका आरोग्य अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
00000

Previous articleसटाणा शहरात सहा दुकाने सील कोरोना नियमांचे केले होते उल्लंघन           
Next articleऔद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here