Home माझं गाव माझं गा-हाणं सटाणा शहरात सहा दुकाने सील कोरोना नियमांचे केले होते उल्लंघन     ...

सटाणा शहरात सहा दुकाने सील कोरोना नियमांचे केले होते उल्लंघन           

98
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा शहरात सहा दुकाने सील कोरोना नियमांचे केले होते उल्लंघन                                         सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
सटाणा शहरात आज बुधवार दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी लॉकडाऊनचे उल्लंघन करून दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर बागलाणचे तहसीलदार मा.जितेंद्र इंगळे-पाटील आणि पोलीस निरीक्षक मा.नंदकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने आज धडक कारवाई करत शहरातील सहा दुकाने सील केली आहेत.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन अंमलात असताना सटाणा शहरात बरेच व्यावसायिक सकाळी ७ ते ११ या विहित वेळेपेक्षा जास्त वेळ आपली दुकाने व व्यवसाय सुरू ठेवत असलेबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे बागलाणचे तहसीलदार मा.जितेंद्र इंगळे-पाटील आणि पोलीस निरीक्षक मा.नंदकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने आज रोजी धडक कारवाई केली. सध्या लॉक डाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांना सकाळी ७ ते ११ वा पर्यंत आपले व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु काही व्यावसायिक ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवताना आढळून आले. अशा सहा व्यावसायिकांची दुकाने आज तहसीलदार श्री.इंगळे-पाटील व पोलीस निरीक्षक श्री.गायकवाड यांच्या संयुक्त पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.देवेंद्र शिंदे यांनी पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांसोबत सील केली आहेत.

शहरातील अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच दुकाने सुरू ठेवावी तसेच लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here