Home Breaking News 🛑 PUBG, लूडोसह तब्बल 275 चिनी अ‍ॅप्स बॅन करण्याच्या तयारीत सरकार, वाचा...

🛑 PUBG, लूडोसह तब्बल 275 चिनी अ‍ॅप्स बॅन करण्याच्या तयारीत सरकार, वाचा लिस्ट 🛑

86
0

*.*

🛑 PUBG, लूडोसह तब्बल 275 चिनी अ‍ॅप्स बॅन करण्याच्या तयारीत सरकार, वाचा लिस्ट 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 28 जुलै : ⭕ केंद्र सरकारने पुन्हा एकदा चीनला जबरदस्त झटका देत टेक कंपन्यांवर कारवाई केली आहे. सरकारनं चीनचे तब्बल 47 आणखी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. अद्याप हे 47 अ‍ॅप्स कोणते आहेत, याबाबत माहिती मिळाली नसली तरी मोदी सरकारने चीनवर केलेले हे दुसरे डिजिटल स्ट्राइक आहे. आता बॅन करण्यात आलेले 47 अ‍ॅप्स हे गेल्या महिन्यात बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्सचे क्लोनिंग करत होते. उदा. टिकटॉक बॅन झाल्यानंतर लोकं टिकटॉक लाइट मात्र प्ले स्टोअरवर होते.

याआधी चीनने केलेल्या कुरघोडींना उत्तर म्हणून गेल्या महिन्यात केंद्र सरकारने टिकटॉक, हेलोसह एकूण 59 अ‍ॅप्स बॅन केले होते. यामध्ये Shareit, कॅमस्कॅनर (CAMscanner) यांसारखे प्रसिद्ध अ‍ॅप्स होते. एवढेच नाही तर सरकार आता आणखी 275 अ‍ॅप्स बॅन करण्याच्या वाटेवर आहेत. यामध्ये पब्जी, लूडो, अलिबाबा सारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचा समावेश आहे.

सरकार सध्या या 275 अ‍ॅप्सवर नजर ठेवून आहे. हे अ‍ॅप्स नॅशनल सिक्यूरिटी किंवा युझरची माहिती तर लीक करत नाही आहे ना, याची तपासणी केली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपन्याचे सर्व्हर चीनमध्ये आहे, अशा कंपन्यांचे अ‍ॅप्स बॅन केले जाणार आहे.

सरकारनं तयार केलेल्या यादीमध्ये काही प्रमुख गेमिंग अ‍ॅप्सचाही समावेश आहे. यात PUBG Mobile, Ludo World यांचा समावेश आहे. तसेच, रिव्ह्यू केले जात असलेल्या लिस्टमध्ये Xiaomiने तयार केलेले Zili अ‍ॅप, इ-कॉमर्स Alibabaचे Aliexpress अ‍ॅप, Resso अ‍ॅप आणि Bytedance चे ULike अ‍ॅप यांचा समावेश आहे.

चायना अ‍ॅप्सच्या माध्यमातून चीन Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर काही अ‍ॅप्सचा गैरवापर करत आहे. हे अ‍ॅप्स गुप्तपणे आणि बेकायदेशीरपणे वापरकर्त्याचा डेटा चोरून तो भारताबाहेरील सर्व्हरवरला पाठवत होते. या व्यतिरिक्त भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र, गृह मंत्रालय यांनाही अशा धोकादायक अ‍ॅप्सवर तातडीनं बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानुसार 59 अ‍ॅप्स भारतात न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.⭕

Previous article*युवा मराठा न्युजचा नावलौकिक* *लोकचळवळीचे स्वरुप झाले प्राप्त…*
Next articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, फक्त २८ हजारच घ्यावे ; मा. राजेश टोपे –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here