• Home
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, फक्त २८ हजारच घ्यावे ; मा. राजेश टोपे –

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, फक्त २८ हजारच घ्यावे ; मा. राजेश टोपे –

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, फक्त २८ हजारच घ्यावे ; मा. राजेश टोपे –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
*—————*
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी नसलेल्या लोकांना ही आता कोरोना उपचारांकरिता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याच प्रमाणे, राज्यातील खाजगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्का बाबत देखील राज्याच्या आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, “आता खाजगी रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना बिल आकारताना त्यांच्या बेडचं बिल प्रति दिन ४ हजार प्रमाणे आकारावं व त्यानुसारच रुग्णाचं ७ दिवसांचं बिल हे केवळ २८ हजार इतकंच असेल. या नियमा प्रमाणेच, यापुढे खाजगी रुग्णालयांनी बिल आकारावं, असं राज्याचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. ते औरंगाबाद येथे पहाणी दौ-यावर असताना बोलत होते.

anews Banner

Leave A Comment