Home नांदेड ओबीसी संघर्ष समितीची देगलूर येथे बैठक संपन्न झाली

ओबीसी संघर्ष समितीची देगलूर येथे बैठक संपन्न झाली

140
0

आशाताई बच्छाव

IMG-20230927-WA0014.jpg

ओबीसी संघर्ष समितीची देगलूर येथे बैठक संपन्न झाली

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

ओबीसी संघर्ष समिती देगलूरच्या वतीने उपजिल्हाधिकारी कुलदीप जंगम साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी केली कि मराठा समाजाला आरक्षण देतेवेळी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासंदर्भात निवेदन दिले असता, त्यापुढील दिशा ठरविण्यासाठी आज भुमय्या लॉज मध्ये बैठक संपन्न झाली यामध्ये पुढिल आंदोलनाची दिशा ठरवुन साखळी उपोषणा बसण्या संदर्भात दिशा ठरवुन लवकरच देगलूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे त्यासंदर्भात दि 03 ऑक्टोबर रोजी मा जिल्हाधिकारी नांदेड यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन पुढील आंदोलन करण्यात येईल असे या बैठकीत ठरले यावेळी या बैठकीत ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाधर भांगे साहेब कार्याध्यक्ष दिगंबरराव कडलवार भुमन्ना चिलवरवार सर उपाध्यक्ष मीरा मोहियोदिन ,लच्छिराम अन्नमवार, उत्तमराव वाडिकर रामास्वामी ,आनंदराव राजुरे सहसचिव संजय जोशी कोष्याध्यक्ष पांडलवार, ओबीसी संघर्ष समितीचे प्रसिध्दी प्रमुख धनाजी जोशी, योगेश साखरे सल्लागार ॲड एन जी सुर्यवंशी साहेब ,ॲड योगेश मंत्री सुनील कळसकर, सुर्यकांत सुवर्णकार, देविदास बोधनकर कल्याण कळसकर,गरुडकर,रणवीरकर, नागनाथ वजिरे, सुभाष बोधनकर, नगरसेवक शैलेश उल्लेवार, ॲड अवधूत राजकुंटवार, माऊली माळगे, बालाजी रेंनगुटवार यांच्या समवेत अनेक ओबीसी संघर्ष समितीचे सदस्य पदाधिकारी व ओबीसी समाज बांधव उपस्थित होते…

Previous articleसामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणारे खडकीतील राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ
Next articleबोळेगाव ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी विठ्ठल जी तुकडेकर बिनविरोध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here