Home मुंबई मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन...

मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकांना निर्देश

91
0

राजेंद्र पाटील राऊत

मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकांना निर्देश

खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सहायक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांना जबाबदारी देण्याची सूचना

आगीमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक कोविड केंद्राच्या आवारात अग्निशमन दलाचे वाहन तैनात ठेवण्याची सूचना

मुंबई, दि.२८: ( वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)  मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे त्यांनी सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना सांगितले.

एमएमआर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी ठाणे,रायगड, पालघर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ऑक्सिजन, रेमडेसिवीर उपलब्धतेचा आढावाही घेण्यात आला. त्यासोबतच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची माहिती मिळवण्यासाठी कॉल सेंटरचा प्रभावी वापर करण्याची सूचना श्री. शिंदे यांनी केली.

उन्हाळा सुरु झाल्याने वातानुकूलित यंत्र आणि व्हेंटिलेटर यामुळे अतिरिक्त वीज वापरली जाते. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आगी लागण्याची शक्यता असल्याने कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी अग्निशमन दलाचे वाहन तैनात करण्याची सूचना श्री. शिंदे यांनी केली. यासोबतच अनेकदा खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याच्या घटना टाळण्यासाठी सहायक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांच्या मदतीने या ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवणे आणि ऑक्सिजन कमी होताच पालिकेला कळवणे बंधनकारक करण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच कोविड केअर सेंटर मधील महिला रुग्णांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्ष राहण्याचे आदेश देखील श्री. शिंदे यांनी दिलेत.

काही महानगरपालिकांच्या भागातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे निरीक्षण काही महापालिका आयुक्तांनी नोंदवले. मात्र तरीही ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करून कार्यान्वित करण्याचे निर्देश देखील नगरविकास मंत्र्यांनी सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

0000

Previous articleएम बी बी एस मध्ये यश मिळवल्या बद्दल डॉ.शेख नजमा चे अभिनंदन
Next article🛑 महाराष्ट्राच्या लॉकडाउन सारख्या निर्बंधांना १५ मे पर्यंत वाढविण्यात येईल – आरोग्यमंत्री राजेश टोपे 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here