राजेंद्र पाटील राऊत
दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना जर्नलिस्ट्स वेल्फेअर स्किम अंतर्गत मदत।
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
———
कोविड19 ने ज्या पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत त्यांच्या नजिकच्या नातेवाईकांना केंद्र सरकारच्या जर्नलिस्ट्स वेल्फेअर स्किम मधून पाच लाख रूपयांची आर्थिक मदत केली जाते.. त्यासाठी किती पत्रकारांचे कोरोनानं मृत्यू झालेत याची माहिती संकलित करण्याचे काम पत्र सूचना कार्यालय, पीआयबीच्यावतीने करण्यात येत आहे.. ज्या पत्रकाराचे निधन झाले आहे त्यांच्या नातेवाईकांनी Additional Director General, press facilities
PIB यांच्या नावाने अर्ज करायचे आहेत.. त्यासाठी विशिष्ट नमुन्यात अर्ज करायचा असून अर्जाचा नमुना पीआयबी च्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेता येईल.. अर्जासोबत काही कागदपत्रे पाठवायची आहेत.. ती खालील प्रमाणे आहेत.
1) पत्रकार असल्याचा पुरावा
2) कोविड ने मृत्यू झाल्याची वैद्यकीय कागदपत्रे
3) डेथ सर्टिफिकेट
4)उत्पन्नाचे प्रमाणपत्र किवा आयटी रिटर्न भरल्याची कागदपत्रे
अर्जासोबत वरील कागदपत्रे जोडून हा अर्ज आपला अर्ज
prspib101@gmail.com या पत्यावर मेल करावयाचा आहे.. ही माहिती PIB च्या वतीने देण्यात आली आहे.
सोबत एनयुजेमहाराष्ट्र च्या nujmaharashtra@gmail.com वर ही माहिती सीसी करावी,जेणेकरून एनयुजे इंडिया दिल्ली चे वरिष्ठ पत्रकार व एनयुजेमहाराष्ट्र चे मार्गदर्शक मा शिवेंद्रकुमार याकामी सहकार्य करतील
महाराष्ट्रात कोविड 19 ने 109 पत्रकारांचे बळी गेले आहेत.. महाराष्ट्र सरकारकडून मदतीसाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.ती लवकरच मिळेल हा विश्वास आहे.
शीतल करदेकर सीमा भोईर
अध्यक्ष एनयुजेमहाराष्ट्र सरचिटणीस ,एनयुजेमहाराष्ट्र
संपर्क + कैलास उदमले ,संघटन सचिव (91 99694 98037)
यांच्या शी संपर्क करण्यात यावा अशी नम्र विनंती केली आहे.