Home कोकण नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस थांब्यासाठी संगमेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात १ मे ला...

नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस थांब्यासाठी संगमेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात १ मे ला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण 🛑

108
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस थांब्यासाठी संगमेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात १ मे ला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण 🛑
✍️ संगमेश्वर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

संगमेश्वर/ रत्नागिरी :-⭕कोकण रेल्वे प्रशासनाला नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस गाडीला संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा मिळविण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही हालचाल प्रशासनाकडून होत नसल्याने निसर्गरम्य चिपळूण -निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपने १ मे ला उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. करोनाचे नियम पाळून हे उपोषण करण्यात येईल असे ग्रुपचे प्रमुख आणि पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले. नेत्रावती (अप-डाऊन) आणि मत्स्यगंधा (अप-डाऊन) एक्सप्रेसला संगमेश्वर स्थानकावर थांबा मिळावा यासाठी आम्ही 19 नोव्हेंबर 2019 रोजी पहिले पत्र कोकण रेल्वे कार्यालय, रत्नागिरी येथे दिले होते. त्यावर कोकण रेल्वेने 10 डिसेंबर 2019 रोजी आम्हाला उत्तर पाठविले होते. परंतु ते उत्तर पटण्याजोगे नव्हते. त्यात मूळ प्रश्न, मूळ मागणी यांच्याबाबत समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली होती. आम्ही कोकण रेल्वेच्या उत्तराच्या पत्राला प्रति- उत्तरादाखल 10 पानांचे पत्र 5 फेब्रुवारी 2020 रोजी रत्नागिरी येथील कोकण रेल्वे कार्यालयात दाखल केले. त्यावर महिनाभरात उत्तर येणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. या पत्राचे उत्तर पाठविल्याचा दावा कोकण रेल्वे प्रशासनाने केला असला तरी तसे पत्र आम्हाला पोस्टाने किंवा कुरिअरने मिळेलेले नाही. आमचे सदस्य जानेवारी 2021 मध्ये कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयात गेले असताना त्या पत्राची प्रत आम्हाला देण्यात आली.

दरम्यान मार्च 2020च्या शेवटच्या आठवड्यात सगळीकडे करोना-कोविड महामारीचा प्रादुर्भाव वाढला. सगळीकडे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर आम्ही 26 नोव्हेंबर 2020 रोजी संगमेश्वर रेल्वे स्थानक व्यवस्थापन आणि कोकण रेल्वे रत्नागिरी कार्यालयाच्या विभागीय अधिकारी कार्यालय येथे (स्मरण पत्र Reminder letter ) जाऊन पत्रे दाखल केली.

त्यानंतर आम्ही जानेवारी 2021 रोजी पुन्हा रत्नागिरी कार्यालयात गेलो असताना तिथून आम्हाला लिहिले गेलेले 5 फेब्रुवारी 2020 च्या पत्रोत्तराची झेरॉक्स आणि 26 नोव्हेंबर 2020 च्या पत्रोत्तराची मूळ प्रत दिली गेली. अर्थात, ही दोन्ही उत्तरे समाधानकारक नाहीत. कोकणचे भूमिपुत्र अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. परंतु त्यांना दिलासा देणारी कोणतीही कृती कोकण रेल्वेकडून होत नाही.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयापर्यंत कोकण रेल्वे प्रवाशांच्या मागणीचा पाठपुरावा नेणे आवश्यक असताना, कोकण रेल्वे प्रशासन वेळकाढूपणा करत आहे, असे स्पष्ट दिसते.
आम्ही कोकण रेल्वेकडून जानेवारी 2021 मध्ये मिळालेल्या उत्तराच्या प्रतीला, आमचे उत्तर म्हणून 2 फेब्रुवारी 2021 रोजी पत्र पाठविले. परंतु जवळपास दोन महिने होत आले तरी त्या पत्राला कोकण रेल्वे प्रशासनाकडून उत्तर आलेले नाही. आमच्या प्रश्नांची, मागण्यांची दखलही घेतलेली नाही.त्यामुळे आमच्या रास्त मागणीकरिता आम्ही प्रशासनाचे लक्ष्य पुन्हा वेधणार आहोत.

त्यासाठी येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे निमित्त संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात मोजके कार्यकर्ते, भूमिपुत्र, कोकण रेल्वे प्रवासी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. हे उपोषण शांततेत असेल. त्यावेळी उपोषणकर्त्यांसोबत समर्थक गर्दी करणार नाहीत.

करोना संदर्भातील सरकारचे सगळे नियम पाळून आंदोलक केले जाईल. असे संदेश जिमन यांनी सांगितले. ⭕

Previous articleउस्मानाबादेत सलून व्यवसायिकाने मृत्युला कवटाळले 🛑
Next articleमनसेचे संदिप फडकले यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील आदर्श शाळा असगणी नं-२ साठी लॅपटॉप मदत 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here