Home कोकण मनसेचे संदिप फडकले यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील आदर्श शाळा असगणी नं-२ साठी...

मनसेचे संदिप फडकले यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील आदर्श शाळा असगणी नं-२ साठी लॅपटॉप मदत 🛑

103
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मनसेचे संदिप फडकले यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील आदर्श शाळा असगणी नं-२ साठी लॅपटॉप मदत 🛑
✍️ खेड:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड/ रत्नागिरी :-⭕असगणी गावचे सुपुत्र संदिप हरी फडकले कामगार सर चिटणीस म.न.से रत्नागिरी जिल्हा यांनी अथक प्रयत्न करून असगणी शाळा नं – २ साठी DELL कंपनीचा लेपटाॅप शाळेतील मुलांसाठी मिळवून दिला. जि.प.शाळा असगणी नं.२ शाळेला जि. प. चा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे. तसेच या शाळेची मॉडेल शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे.

अशा वेग वेगळ्या कंपनीच्या माध्यमातुन पंचक्रोशीतील शाळाना शैक्षणिक वस्तु मिळवून दिल्या दिल्या.

याआधी संदिप फडकले यांनी पंचक्रोशीतील १८ शाळा डिजिटल केल्या आहेत तसेच विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात. आज दिनांक १२ एप्रिल २०२१ रोजी लॅपटॉप देण्यात आला. लॅपटॉप देतेवेळी संरपंच अनंत नायनाक, माजी उपसरपंच श्रीकात फडकले, सुरेश नायनाक, धामनदेवी उपअध्यस मनसे अशोक बुरटे, सुनिल धाडवे -शिक्षण कमिटी अध्यक्ष, संजय बुरटे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य चेतन पवार, संदिप धाडवे,राजेंद्र धाडवे, विठ्ठल नायनाक,संजय पदुमले, शांताराम बाईत व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here