राजेंद्र पाटील राऊत
हिप्परगा (माळ) ता.बिलोली येथे कोरोना covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर संपन्न…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
ग्राम पंचायत कार्यालय हिप्परगा (माळ) येथे कोरोना पासुन गाव सुरक्षीत राहावे व त्याची लागण होऊ नये याकरिता ग्राम पंचायत कार्यालयातर्फे कोरोना प्रतिबंध लस शिबीर आयोजित करण्यात आले होते..सर्वप्रथम महात्मा ज्योतीबा फुले यांची आज जयंती असल्याने त्यांच्या प्रतिमेचे पुजन ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच तिरुपती पा. डाकोरे व डॉ.रघुनाथ क्षेत्री सरांच्या हस्ते करुन या शिबिरास सुरुवात करण्यात आली..
या शिबिरास गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला एका दिवसात 100 च्या वर व्यक्तींना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली.. या साठी आरोग्य विभागातर्फे चिटमोगरा उपकेंद्र अंतर्गत तज्ञ डॉक्टरांची टीम यावेळी उपस्थित होती..यामध्ये डॉ.रघुनाथ क्षेत्री सर
सुपरवाईजर एच. ए. गोविंदवाड सर, आरोग्य सेवक वाघमारे सर,आरोग्य सेविका यास्मिन शेख , आशा वर्कर उज्वला बामणे,संगीता सोंडारे
अंगणवाडी सेविका पुष्पाबाई सोंडारे,सुरेखाताई ढगे,राधाबाई सोंडारे व गावातील प्रतिष्ठित नागरिक हणमंतराव पो पा, विठ्ठलराव पा. डाकोरे, संभाजी पा. डाकोरे,किशन पा.जाधव,संभाजी पा.जाधव,मारोती पा. डाकोरे,विनोद सोंडारे, भारत पा. डाकोरे व ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच तिरुपती मारोती पा. डाकोरे, उपसरपंच संतोष दासवाड,
उपसरपंच ज्ञानेश्वर पा.जाधव,गणेश पांचाळ, बापुराव पा. डाकोरे आदी जन उपस्थित होते…