Home पश्चिम महाराष्ट्र कोरोनाला हरवत व किराणा दुकान सांभाळत अश्विनीने पटकावला गेट परीक्षेत देशात प्रथम...

कोरोनाला हरवत व किराणा दुकान सांभाळत अश्विनीने पटकावला गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक

87
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोनाला हरवत व किराणा दुकान सांभाळत अश्विनीने पटकावला गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

#बार्शी तालुक्‍यातील गौडगावची कन्या व श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगाव संचलित श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगरची विद्यार्थिनी अश्विनी सहदेव कणेकर हिने गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावत देदीप्यमान कामगिरी केली आहे.

मळेगाव ता.बार्शी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील गौडगावची कन्या व श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगाव संचलित श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगरची विद्यार्थिनी अश्विनी सहदेव कणेकर हिने गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावत देदीप्यमान कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अश्विनीच्या या यशाने “बार्शी तिथे सरशी’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अश्विनी कणेकरने गेट – 2021 परीक्षेत 79.67 टक्के गुणांसह बाजी मारली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतर्फे घेण्यात आलेल्या गेट परीक्षेत आठ लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात 17 टक्के रिझल्ट लागला असून, अश्विनी कणेकर हिने
1000 पैकी 945 गुण मिळवत टेक्‍स्टाईल विभागातून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गौडगाव (ता. बार्शी) येथे जन्मलेल्या अश्विनीने प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण श्री नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगर, पुणे येथे पूर्ण केले. डीकेटी शिक्षण संस्था, इचलकरंजी येथे गेट परीक्षेची तयारी करीत तिने हे उज्ज्वल यश संपादन केले आहे. श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगर येथे आई-वडिलांसोबत तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे सहसचिव हेमंत गडसिंग, उपाध्यक्ष प्रमोद जगताप, प्राचार्य एच. डी. मोरे, उपप्राचार्य एस. एस. तिकटे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleखमताणे शिवारातील टरबुज काश्मिर मंडईकडे रवाना…         
Next article🌹प्रथम पुण्यस्मरण! स्वर्गिय दादाजी रतन शेवाळे यांना भावपुर्ण श्रध्दांजली🌹
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here