Home सामाजिक 🌹प्रथम पुण्यस्मरण! स्वर्गिय दादाजी रतन शेवाळे यांना भावपुर्ण श्रध्दांजली🌹

🌹प्रथम पुण्यस्मरण! स्वर्गिय दादाजी रतन शेवाळे यांना भावपुर्ण श्रध्दांजली🌹

83
0

राजेंद्र पाटील राऊत

🌹प्रथम पुण्यस्मरण! स्वर्गिय दादाजी रतन शेवाळे यांना भावपुर्ण श्रध्दांजली🌹 माणूस जन्मला येतो त्यावेळेस त्याला फक्त श्वास असतो तर नाव नसते,नंतर मात्र आपल्या स्वकर्तृत्वावर कार्यकौशल्याने स्वतःच्या नावाचा जागर हा मागे ठेवावा लागतो.कारण माणूस जन्मला येतो,त्याचवेळी एक ना एक दिवस त्याला या नश्वरतेचा त्याग करुन इहलोकीचा प्रवासाला जावेच लागते.हे निसर्गनियमाचे चक्र आजवर कुणीच थांबवू शकलेलं नाही.तरीही काही माणसं जन्माला येतात आहेत आपल्या आठवणीच्या रुपाने स्मृती कायम मागे ठेऊन जातात.असाच एक कायम आठवणीत राहिल असा एक अवलिया म्हणजे दादाजी रतन शेवाळे रा.व-हाणे ता.मालेगांव यांचे दिनांक ९एप्रिल रोजी वार्धक्याने निधन झाले.आज शुक्रवार दिनांक ९ एप्रिल रोजी शुक्रवारी त्यांना आपल्यातून जाऊन बघता-बघता एक वर्षाचा कालावधी लोटला गेला.पण…नजरेसमोर अजूनही त्यांचे विचार,आचार,संस्कार काही केल्या मनातून जात नाहीत.वास्तविक दादाजी रतन शेवाळे हे माझे नातेवाईकच.माझ्या आईच्या मामाचा मुलगा!पण..माझी अत्यंत जवळून ओळख परिचय बहुतेक ३५ वर्षापूर्वी त्यांचेशी झाला.माझं बालपण ज्या कौळाणे (निं)गावात गेले.त्याच गावाच्या शेजारी त्यांचे व-हाणे हे गाव आहे.मी त्याकाळी मी दै.”सकाळ”वृतपत्रांचा या भागातील पत्रकार म्हणून कार्यरत होतो.आणि त्याशिवाय माझी वृतपत्र वाटपची एजन्सीही होती,त्यामुळे माझे साहजिकच व-हाणे गावी नेहमी येणे -जाणे होते.आणि त्याकाळी मला एकमेव आधार आणि धाडस देण्याचे महान कार्य केले ते फक्त दादाजी रतन शेवाळे यांनीच!त्यामुळे मला धैर्य ,हिंमत,धाडस हे सर्व गुण आत्मसात करता आले.व-हाणे गांवी तर तस रोजच जाणे येणे होते.पण…कधी मला दादाजी रतन शेवाळे यांनी उपाशीपोटी जाऊ दिले नाही.स्वतः ची एकूलती एक मुलगी आशा उर्फ अक्का हिनेही मला कधी उपाशी राहू दिले नाही.घरी आईवडील असोत किंवा नसोत अगोदर जेवण हे माझ्यासाठी ठरलेलेच असायचे.असा हा अवलिया दादाजी रतन शेवाळे आणि मी दिवस दिवसभर गप्पा मारत बसायचो.तर कधी त्यांच्याच शेतात गाईगुरे चारत असताना मनसोक्त गप्पात डुंबून जायचो.माझेसारख्या लहानपणापासूनच वडिलांच्या प्रेमाला पारखा झालेल्या मुलाला तरी कधी परकेपणाची जाणीव दादाजी शेवाळे यांनी होऊ दिली नाही.माणूस फक्त जीव लावतो,माणूसकी जोपासतो,जिव्हाळ्याने प्रत्येकाला आपलेसे करुन घेतो,अगदी तसचं या अवलिया माणसाने खर करुन दाखविले.स्वतःच्या स्वाभिमानाने जगत राहिला.आत्मसन्मान कधीच गमावला नाही.आणि तिच प्रेरणा नेहमी आशिर्वाद म्हणून मला कामी येईल यात तीळमात्र शंका नाही.तरीही ज्या माणसाने आयुष्याच्या प्रवासात फक्त आणि फक्त जीवच लावला,त्या माणसाला म्हणजे दादाजी रतन शेवाळे हे जरी आज आपल्यात नसले तरी त्यांना या जन्मी तरी विसरणेच अशक्य आहे.दादाजी रतन शेवाळे यांच्या पावन स्मृतीस विनम्रअभिवादन करुन….फक्त त्यांच्याच शिकवणीवर आमची वाटचाल यापुढेही सुनिश्चीतपणे सुरु रहावी हिच परमेश्वर चरणी प्रार्थना!!तिच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल एवढेच यानिमिताने!!* *राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड न्युज चँनल,ए.बी.एन.मिडिया नेटवर्क महाराष्ट्र*प्रथम पुण्यस्मरण! स्वर्गिय दादाजी रतन शेवाळे यांना भावपुर्ण श्रध्दांजली🌹                माणूस जन्मला येतो त्यावेळेस त्याला फक्त श्वास असतो तर नाव नसते,नंतर मात्र आपल्या स्वकर्तृत्वावर कार्यकौशल्याने स्वतःच्या नावाचा जागर हा मागे ठेवावा लागतो.कारण माणूस जन्मला येतो,त्याचवेळी एक ना एक दिवस त्याला या नश्वरतेचा त्याग करुन इहलोकीचा प्रवासाला जावेच लागते.हे निसर्गनियमाचे चक्र आजवर कुणीच थांबवू शकलेलं नाही.तरीही काही माणसं जन्माला येतात आहेत आपल्या आठवणीच्या रुपाने स्मृती कायम मागे ठेऊन जातात.असाच एक कायम आठवणीत राहिल असा एक अवलिया म्हणजे दादाजी रतन शेवाळे रा.व-हाणे ता.मालेगांव यांचे दिनांक ९एप्रिल रोजी वार्धक्याने निधन झाले.आज शुक्रवार दिनांक ९ एप्रिल रोजी शुक्रवारी त्यांना आपल्यातून जाऊन बघता-बघता एक वर्षाचा कालावधी लोटला गेला.पण…नजरेसमोर अजूनही त्यांचे विचार,आचार,संस्कार काही केल्या मनातून जात नाहीत.वास्तविक दादाजी रतन शेवाळे हे माझे नातेवाईकच.माझ्या आईच्या मामाचा मुलगा!पण..माझी अत्यंत जवळून ओळख परिचय बहुतेक ३५ वर्षापूर्वी त्यांचेशी झाला.माझं बालपण ज्या कौळाणे (निं)गावात गेले.त्याच गावाच्या शेजारी त्यांचे व-हाणे हे गाव आहे.मी त्याकाळी मी दै.”सकाळ”वृतपत्रांचा या भागातील पत्रकार म्हणून कार्यरत होतो.आणि त्याशिवाय माझी वृतपत्र वाटपची एजन्सीही होती,त्यामुळे माझे साहजिकच व-हाणे गावी नेहमी येणे -जाणे होते.आणि त्याकाळी मला एकमेव आधार आणि धाडस देण्याचे महान कार्य केले ते फक्त दादाजी रतन शेवाळे यांनीच!त्यामुळे मला धैर्य ,हिंमत,धाडस हे सर्व गुण आत्मसात करता आले.व-हाणे गांवी तर तस रोजच जाणे येणे होते.पण…कधी मला दादाजी रतन शेवाळे यांनी उपाशीपोटी जाऊ दिले नाही.स्वतः ची एकूलती एक मुलगी आशा उर्फ अक्का हिनेही मला कधी उपाशी राहू दिले नाही.घरी आईवडील असोत किंवा नसोत अगोदर जेवण हे माझ्यासाठी ठरलेलेच असायचे.असा हा अवलिया दादाजी रतन शेवाळे आणि मी दिवस दिवसभर गप्पा मारत बसायचो.तर कधी त्यांच्याच शेतात गाईगुरे चारत असताना मनसोक्त गप्पात डुंबून जायचो.माझेसारख्या लहानपणापासूनच वडिलांच्या प्रेमाला पारखा झालेल्या मुलाला तरी कधी परकेपणाची जाणीव दादाजी शेवाळे यांनी होऊ दिली नाही.माणूस फक्त जीव लावतो,माणूसकी जोपासतो,जिव्हाळ्याने प्रत्येकाला आपलेसे करुन घेतो,अगदी तसचं या अवलिया माणसाने खर करुन दाखविले.स्वतःच्या स्वाभिमानाने जगत राहिला.आत्मसन्मान कधीच गमावला नाही.आणि तिच प्रेरणा नेहमी आशिर्वाद म्हणून मला कामी येईल यात तीळमात्र शंका नाही.तरीही ज्या माणसाने आयुष्याच्या प्रवासात फक्त आणि फक्त जीवच लावला,त्या माणसाला म्हणजे दादाजी रतन शेवाळे हे जरी आज आपल्यात नसले तरी त्यांना या जन्मी तरी विसरणेच अशक्य आहे.दादाजी रतन शेवाळे यांच्या पावन स्मृतीस विनम्रअभिवादन करुन….फक्त त्यांच्याच शिकवणीवर आमची वाटचाल यापुढेही सुनिश्चीतपणे सुरु रहावी हिच परमेश्वर चरणी प्रार्थना!!तिच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल एवढेच यानिमिताने!! राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड न्युज चँनल,ए.बी.एन.मिडिया नेटवर्क महाराष्ट्र

Previous articleकोरोनाला हरवत व किराणा दुकान सांभाळत अश्विनीने पटकावला गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक
Next articleशेळगांव गौरी येथे कोरोना covid-19 लस व जनजागृती फेरी सपंन्न…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here