• Home
  • शक्यतो कोरोना रुग्णावर मुखेडातच उपचार करावा – आ. डॉ. तुषारजी राठोड उपजिल्हा रुग्णालय प्रशासन व खाजगी डॉक्टरां सोबत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न..

शक्यतो कोरोना रुग्णावर मुखेडातच उपचार करावा – आ. डॉ. तुषारजी राठोड उपजिल्हा रुग्णालय प्रशासन व खाजगी डॉक्टरां सोबत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210327-WA0093.jpg

शक्यतो कोरोना रुग्णावर मुखेडातच उपचार करावा –
आ. डॉ. तुषारजी राठोड
उपजिल्हा रुग्णालय प्रशासन व खाजगी डॉक्टरां सोबत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यात व शहरात सक्षम आरोग्य सेवा आरोग्य प्रशासनाने द्यावी व शक्यतो कोरोना बाधित रुग्णावर मुखेडातच उपचार करावा अशा सूचना आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी उपजिल्हा रुग्णालय तथा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य प्रशासनाला दिला आहे.
मुखेड तालुक्यात जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे यावर उपाय योजना करण्यासाठी आ. डॉ. तुषार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली तहसील सभागृहात एक आपातकालीन बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार काशिनाथ पाटील, नगराध्यक्ष बाबूराव देबडवार ,पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, मुख्याधिकारी विजय चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.आनंद पाटील, मुखेड भूषण डॉ.दिलीप पुंडे, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.अशोक कौरवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, भाजपा शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान यांच्यासह शहरातील खाजगी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.तुषार राठोड म्हणाले मुखेड तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत याच बरोबर शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. तेथेच पन्नास खांटाचे समर्पित कोरोना रुग्णालय मागच्या वर्षी सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व यंत्रसामुग्री आहे. नांदेड शहरातील खाजगी रुग्णालय व शासकीय रुग्णालय कोरोना बाधित रुग्णानी तुडुंब भरली आहेत. अशावेळी उपजिल्हा रुग्णालयातील व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना बाधितांवर मुखेडातच उपचार करावा. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार करावा. आपल्याकडे असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा उपयोग करून घ्यावा जेणेकरून रुग्णांना दर्जेदार सेवा मिळेल व नांदेड येथील आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार नाही. मुखेड उपजिल्हा रुग्णालयात रेमेडी सेवर व रक्ताच्या काही चाचण्या मुखेडातच उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांसोबत मी बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रसिद्ध सर्पदंश तज्ञ डॉ.दिलीप पुंडे यांनी आरोग्य विभागाला काही सूचना देत सांगितले की कोरोना समर्पित रुग्णालयात निष्णात डॉक्टरांनी रुग्णांना उपचार द्यावा. तसेच व्हेंटिलेटर उपयोगात आणावेत जेणेकरून रुग्णाचे प्राण वाचवता येतील. समर्पित कोरोना रूग्णालयात उपचाराचा एक प्रोटोकॉल तयार करावा जेणेकरून अनेक रुग्णांना जीवदान मिळेल. यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अशोक कौरवार म्हणाले अतिशय सूक्ष्म लक्षण असलेल्या रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वेगळा वार्ड तयार करून तेथे कोरोना बाधित रुग्णावर उपचार करावा तसेच केवळ अती गंभीर रुग्ण फक्त नांदेडला उपचारासाठी पाठवावेत. कोरोना बाधित रुग्ण हा अचानक गंभीर होत नसतो. योग्य वेळी त्याच्यावर उपचार केल्यास आरोग्य विभागाला व्हेंटिलेटरचे सुद्धा काम पडणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद पाटील म्हणाले मुखेड शहरातील तीन खाजगी डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये काम करण्याची इच्छा दर्शविली असून लवकरच आयसीयू सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश गवाले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात अंटिजन टेस्ट केल्या जात असून कमी लक्षण असलेल्या यावेळी रुग्णांना तेथेच उपचार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला प्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ. व्यंकट सुभेदार, डॉ. रामराव श्रीरामे डॉ.बालाजी गरुडकर डॉ. राहूल मुक्कावार डॉ. फारुकी ,डॉ. पांडुरंग श्रीरामे ,डॉ. वीरभद्र हिमगिरे मुखेड चे पोलीस पाटील माधवराव पाटील टाकळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष एड. सुनील पौळकर पत्रकार संघाचे अध्यक्ष एड. संदीप कामशेटे आदी पत्रकार प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .

anews Banner

Leave A Comment