• Home
  • जमियत उल उलेमाची कार्यकारिणी जाहीर

जमियत उल उलेमाची कार्यकारिणी जाहीर

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210320-WA0092.jpg

जमियत उल उलेमाची कार्यकारिणी जाहीर

मुखेड तालुकाध्यक्षदी हाफीज सय्यद पाशा तर सचिवपदी हाफीज माजीद यांची निवड

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
भारतातील एक चळवळीचे इस्लामीक नेतृत्व करणारी व अतिवृष्टी आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धाऊन येणारी जात-पात न पाहता सर्वाची मदत करणारी जमाते उल उलेमा संघटनातुन मुस्लिम धर्मगुरूंना एका राजकीय व्यासपीठावर आणण्यासाठी ‘जमियत उल उलेमा’ ही संघटना देशात कार्यरत आहे. इस्लामी कायदा (शरीयत) अबाधित राखणे, जनतेला धार्मिक मार्गदर्शन करणे, धर्माचा प्रसार करणे, धर्मस्थानांचे संरक्षण करणे, मागील काळात मुस्लिम समाज हा आर्थिक राजकीय, शैक्षणीक विकासापासुन व सोयी सुविधेपासुन कोसोदुर गेला असुन या समाजाच्या उन्नतीसाठी व यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाला सामाजिक, राजकीय क्षेत्रात मार्गदर्शनासाठी मुखेड येथे शनिवारी दि. १३ मार्च रोजी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. जमीयत उल उलेमा नांदेड जिल्ह्याचे मार्गदर्शक कारी मुहम्मद असद समदी, व मो. अब्दुल वहाब, जिल्हाध्यक्ष मो. उस्मान फैसल कासमी, तसेच जिल्हा सदस्य अरशद भाई, अब्दुल समद यांची प्रमुख उपस्थिती होती. मुखेड तालुकाध्यक्षपदी हाफीज सय्यद पाशा अ. वाहेद, सचिवपदी हाफिज माजिद कोंडाजी, उपाध्यक्ष हाफिज नाजिमोद्दीन निजामोद्दीन सौदागर, कार्याध्यक्ष महंमद यासीन साब, सह सचिव शादुल महेबुब होनवडजकर, संघटक मुफ्ती शेख महंमद अ. जलिल, सह संघटक हाफिज गौस सुलतान, कोषाध्यक्ष हसनोद्दीन अल्लाऊद्दीन (बबलु मुल्ला पत्रकार), सदस्य हाफिज युनुस जानिमीयाँ, हाफिज मोसीन लियाखत, हाफिज सरवर उस्मान, हाफिज अ. गणी, हाफिज नबी मलीक, हाफिज फारुखसाब पाळा, रियाज नवाबसाब शेख, शमशोद्दीन मैनोद्दीन शेख, हाफीज सुलेमान सईद चाऊस, अफरोज मुस्ताक शेख, हाफिज युनुस अ. करिम, प्रसिद्धी प्रमुख अदनान नाजीमोद्दीन सौदागर यांची निवड करण्यात आली. तालुक्यात जमीयत च्यावतीने सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस नुतन कार्यकारिणीने केला आहे.

anews Banner

Leave A Comment