Anshuraj patil
स्टेट बँक ऑफ इंडियाचे रोखपाल बनसोडे सेवानिवृत्त
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर (नांदेड) :
देगलूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे कॅशियर ( रोखपाल ) शिवशंकर यादवराव बनसोडे हे दिनांक ५ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. सेवनिवृत्तीबद्दल बनसोडे पती- पत्नी या दोघांचा बँक शाखेच्या वतीने व देगलूर येथील सर्व व्यापार यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवशंकर बनसोडे व त्यांची पत्नी प्रयागबाई शिवशंकर बनसोडे यांचा बँकेचे शाखाधिकारी जयंत सर, संतोष मांडे तमलुरकर, सयाजी शिवाफुले गणेश चौधरी, सौ. माधुरी चौधरी, देगलूरचे प्रतिष्ठित व्यापारी भगवान पाटील मुजळगेकर, मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत उपअभियंता सौरभ बनसोडे, योगेश बनसोडे, सौ. शिल्पा संदीप जाधव, भगवान काळे, नरसिंग अन्नमवार, देगलूर शहरातील व्यापारी तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन शाखेचे अधिकारी व कर्मचारी ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.