Home नांदेड रामतीर्थ येथे ग्रामपंचायत गणस्तरीय कार्यशाळा संपन्न …

रामतीर्थ येथे ग्रामपंचायत गणस्तरीय कार्यशाळा संपन्न …

138
0

राजेंद्र पाटील राऊत

रामतीर्थ येथे ग्रामपंचायत गणस्तरीय कार्यशाळा संपन्न …
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शंकरनगर
रामतीर्थ तालुका बिलोली येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती बिलोली यांच्या वतीने आमचा गाव आमचा विकास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा 2021- 22 तयार करणे या अनुषंगाने रामतीर्थ येथे रामतीर्थ जिल्हा परिषद मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, महिला बचत गटाच्या महिला, आरोग्य विभागातील अधिकारी पदाधिकारी, ग्रामसेवक, गावातील जबाबदार प्रमुख नागरिक, विद्युत विभागाचे कर्मचारी यांची बिलोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी. एस. जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी शासनाकडून ग्रामपंचायतीला दिला जाणारा पंधराव्या वित्त आयोगातील निधीचा कसा वापर करावा यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करताना नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी गावाच्या विकासासाठी गावातील सर्व जबाबदार नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावे, आपल्या गावात काम कोणते व कसे करावे यासाठी आपल्या परिसरातील उत्कृष्ट कार्य करत असलेल्या गावातील ग्रामपंचायतीना भेट देऊन त्यांच्या कार्याची पद्धत समजावून घ्यावे, आपल्या भागातील कोणत्या गावात काही विशेष उपक्रम राबवले जात असतील तर ते आपल्या गावात राबवण्यासाठी त्यांची मदत घ्यावी. आपल्या गावाच्या विकासासाठी विविध माध्यमातून मिळणारा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सदैव पाठपुरावा करावे यासाठी कोणतेही मतभेद विकास कामात आणू नये तरच आपल्या गावाचा विकास होऊ शकतो असे मत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामतीर्थ ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.मनीषा राजेंद्र तोडे तर प्रमुख उपस्थिती बिलोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी. एस .जाधव उपसरपंच जयश्री मुरलीधर पाटील देगलूरे, रामतीर्थ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हनमंतराव नरवाडे, किनाळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वडजे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पंधराव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत गावामध्ये जो निधी उपलब्ध होतो तो निधी दोन भागांमध्ये विभागलेला असून अर्धा निधी पेयजल योजनेत वापरावा तसेच राहिलेला नीधी शिक्षण,आरोग्य,उपजिविका,गांडूळ खत,डास मुक्त,धोबिघाट,बंधीस्तनाली,मुतारी बांधने, सार्वजनिक स्वछालय दूरूस्त करने,घंटागाडी ,अनुसुचीत जाती जमाती याच्यावर खर्च करावे असे शासनाचे धोरण असल्याचे पंचायत समितीच्या वतीने कळविण्यात आले.
या कार्यशाळेच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून रामतीर्थ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मनीषा तोडे व उपस्थित महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यशाळेला उपस्थित असलेले रामतीर्थ जिल्हा परिषद मतदार संघातील किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने, माजी सरपंच जयवंतराव गायकवाड, चिटमोगरा येथील सरपंच, रामतीर्थ ग्रामपंचायतीचे सदस्य तथा पत्रकार हनुमंत पाटील वाडेकर, सामाजिक कार्यकर्ते पंजाब पाटील भोसले, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपआपल्या गावाविषयी अंडचनी मांडले.
कार्यशाळेस रामतीर्थ जिल्हा परिषद मतदार संघातील सरपंच उपसरपंच सदस्य,जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक,ग्रामसेवक,लाईनमँन,अंगनवाडी शेविका,आशावर्ककर,बच्चतगट,वनपाल,आदिजन मोठ्या संख्येनेउपस्थित होते .
या कार्यक्रमाला मुरलिधर पाटील देगलूरे,राजेद्रं पाटील तोडे,सुनिल काबंळे,शिवाजी पाटील खिस्से,मनोहर मोरे,पंजाबराव भोसले,वनिता जिगळेकर,वनिता भंडारे,शिलाबाई देगलूरे, दैवशाला मोरे,कांबळे,पिसाळे,आदिजन होते.
सुत्रसंचलन पांचाळ सर यांनी केले तर आभार तर उपसरपंच जयश्रीताई देगलूरे यांनी मानले.

Previous articleअंबासनला आशा सेविकांचा महिला दिनी सन्मान
Next articleकुख्यात गुंड गज्या मारणे याने अटकेनंतर पोलिसांना ठोकला सलाम 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here