Home पुणे कुख्यात गुंड गज्या मारणे याने अटकेनंतर पोलिसांना ठोकला सलाम 🛑

कुख्यात गुंड गज्या मारणे याने अटकेनंतर पोलिसांना ठोकला सलाम 🛑

85
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कुख्यात गुंड गज्या मारणे याने अटकेनंतर पोलिसांना ठोकला सलाम 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ एका महिन्यापासून राज्यातील ३ कमिश्नर आणि २ एसपी यांना गुंजारा देणारा कुख्यात गुंड गज्या मारणेला अखेर अटक झाली.

त्याला अटक झाल्यानंतर गज्या मारणे याने चक्क पोलिसांना सलाम ठोकला आहे. इतक्या अंधारात गाडी पण ओळखली आणि मलाही ओळखलं असं म्हणत त्याने मेढा पोलीस ग्रेट आणि माने साहेबपण ग्रेट’ अशी प्रतिक्रिया दिली.

गजा मारणे याला शनिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी अगदी फिल्मी स्टाईलने पकडलं. यावेळी त्यांच्यासोबत वाहन चालक जितेंद्र कांबळे होते. गजा मारणेला पकडल्यानंतर सातारा पोलिसांचे कौतुक होत आहे. मेढा पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. गजा मारणेला येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं आहे.

गजा मारणेला अटक झाल्यांनंतर ही बातमी लगेचच संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. गजा मारणेसोबत त्याच्या ३ साथीदारांना ही पोलिसांनी अटक केली. गजा मारणे अटकेनंतर म्हणाला की, महिनाभर मी ३ कमिशनर आणि २ एसपींना गुंगारा देत होतो. मात्र फक्त दोन दिवसासाठी घात झाला. पकडल्या गेल्यानंतर गजा मारणेने देखील पोलिसांच्या या कामगिरीवर आश्चर्य व्यक्त केलं.⭕

Previous articleरामतीर्थ येथे ग्रामपंचायत गणस्तरीय कार्यशाळा संपन्न …
Next articleगुंड शरद मोहोळला पुण्यात ‘नो एन्ट्री’
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here