• Home
  • गुंड शरद मोहोळला पुण्यात ‘नो एन्ट्री’

गुंड शरद मोहोळला पुण्यात ‘नो एन्ट्री’

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210309-WA0003.jpg

🛑 गुंड शरद मोहोळला पुण्यात ‘नो एन्ट्री’ 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे –⭕येरवडा कारागृहातून बाहेर आल्यानंतर शहरात पुन्हा दबदबा निर्माण करू पाहणाऱ्या गुंड शरद मोहोळ याला आता दोन महिन्यांसाठी पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

तसा आदेशच परिमंडळ-1 च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी दिला आहे.
गुरूवार पेठ येथील कृष्ण हट्टी चौक येथे दि. 26 जानेवारी रोजी पतित पावन संघटनेच्या शाखेच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गुंड शरद मोहोळ, त्याचे साथीदार अक्षय भालेराव, अलोक भालेराव, सीताराम खाडे, दिनेश भिलारे, विश्‍वास मनेरे, मनोज पवार, स्वप्नील नाईक, योगेश वाडेर, मंगेश धुमाळ हे दहा-बारा साथीदारांबरोबर तेथे होता.
गर्दी जमा करून त्यांनी आरडाओरडही केली होती. त्यामुळे तेथे आलेले नागरिक घाबरून तेथून निघून गेले होते.

त्या ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण करून, तसेच करोनाचा संसर्ग होऊ नये या दृष्टीने सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेतल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याच्यासह 16 जणांना अटक झाली होती.

दरम्यान, मोहोळवर सीआरपीसी 144 (2) नुसार प्रतिबंधात्मक आदेश काढण्यासाठी खडक ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी परिमंडळ 1 च्या उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार डॉ. नारनवरे यांनी 4 मार्च रोजी मोहोळ व त्याच्या इतर तेरा साथीदारांना दोन महिन्यांसाठी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात येण्यास प्रतिबंध केला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment