• Home
  • शिवजयंतीचे औचित्य साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे जयगड येथे स्वच्छता मोहीम संपन्न

शिवजयंतीचे औचित्य साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे जयगड येथे स्वच्छता मोहीम संपन्न

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210220-WA0081.jpg

🛑 शिवजयंतीचे औचित्य साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे जयगड येथे स्वच्छता मोहीम संपन्न 🛑
✍️ रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

रत्नागिरी:⭕ शिवजयंती चे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनिल धावडे यांच्यातर्फे किल्ले जयगड येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याला या मावळमातीतील शिवभक्तांचा व शंभूभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला. किल्ले जयगड येथे शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी स्वच्छता मोहिम संपन्न झाली.

यावेळी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी कडून सरपंच सौ. आर्या गडदे मँडम, श्री. विवेकजी सुर्वे साहेब, श्री. बाबूशेठ पाटील, राजा शिवछत्रपती परीवार चे प्रतिनिधी श्री. अलंकार मयेकर यांना पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेला छावा प्रतिष्ठान रत्नागिरी समवेत ३२ मावळ्यांनी सहभाग घेतला होता. सरपंच सौ. आर्या गडदे मँडम, श्री. विवेकजी सुर्वे साहेब, श्री. बाबूशेठ पाटील, राजा शिवछत्रपती परीवार चे प्रतिनिधी श्री. अलंकार मयेकर, शिवभक्त व शंभूभक्त, पर्यटक व स्थानिकांनी इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व या स्वच्छता मोहिमेस सहभागी झाले.

यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठान चे रत्नागिरी जिल्हा संघटक श्री.समीर धावडे, सचिव श्री. समीर गोताड, सदस्य श्री. राहूल धावडे, श्री. विजय धावडे तसेच हिंदू राष्ट्रसेनेचे श्री. प्रविण रोडे, श्री. प्रथमेश कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. ⭕

anews Banner

Leave A Comment