Home अमरावती अमरावती विद्यापीठात एम टेक परीक्षेचा मुहूर्त केव्हा? कुलगुरूंनी अवस्था खर्चावर घेतला आक्षेप.

अमरावती विद्यापीठात एम टेक परीक्षेचा मुहूर्त केव्हा? कुलगुरूंनी अवस्था खर्चावर घेतला आक्षेप.

28
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231031-063205_WhatsApp.jpg

अमरावती विद्यापीठात एम टेक परीक्षेचा मुहूर्त केव्हा? कुलगुरूंनी अवस्था खर्चावर घेतला आक्षेप.
——————————-
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ एम फिल व पीएचडी प्रवेश करता आवश्यक असलेली एम टेक परीक्षा अध्यापही घेतली नाही. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत असून, बाह्य संस्थेला कंत्राट दिला जातो. तथापि परीक्षा का घेण्यात आली नाही, हा विषय हल्ली संशोधनाचा ठरत आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठ सलग्न पाचही जिल्ह्यासह राज्यभराचे साडेसहा हजार विद्यार्थी या परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. अमरावती विद्यापीठ च्या सामंजस्य करारानुसार एमपेट परीक्षेच्या नियोजनासाठी केंद्रावर सर्व व्यवस्था बाह्य संस्थेने करणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यापीठातील काही अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी”निरक्षक: व”मार्गदर्शक”या ग्रुप नावाखाली प्रत्येकी तब्बल १५ते२० हजारांचे देयक काढतात. या निरीक्षकांची यादी एम टेक समिती अंतिम करते आणि कुलगुरूची मान्यता घेते. वास्तविक”डेसीग्नेटेड एजन्सी”लाख कंत्राट दिल्यानंतर केंद्रावरील सर्व जबाबदारी एजन्सी बघत असताना तांत्रिक ज्ञान नसलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांची केंद्रावर कशासाठी नियुक्ती होते? याचा शोध घेणे गरजेचे आहे. थोडक्यात एम टेक परीक्षा काहींना पर्वणी ठरते. त्याकरता दरवर्षी लाखो रुपयाचा अग्रीम घेतला जातो. गप काही वर्षापासून हा प्रकार बिनबोभाट सुरू आहे. यूजीसीच्या गाईड लाईनुसार गाईडलाईननुसार एमपेटची परीक्षा होणार आहे. नवीन निर्देश प्राप्त झाल्यामुळे समिती गठीत झाली होती. त्या समितीच्या काही सूचना असून त्या दुरुस्तीसाठी विद्वत्त परीषेदच्या समोर ठेवल्या जातील. त्यांच्या मान्यतेनंतरच नव्या डायरेक्शननुसार परीक्षा घेण्यात येतील असे मोनाली तोटे-वानखडे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळा मार्फत सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here