Home कोकण वडवळ -कुसावडे पाणी टाकीचा उद्घघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न 🛑

वडवळ -कुसावडे पाणी टाकीचा उद्घघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न 🛑

134
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 वडवळ -कुसावडे पाणी टाकीचा उद्घघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न 🛑
✍️ रायगड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खालापूर/रायगड :-⭕
गोदरेज-खालापुर आणि वाॅटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट ह्यांच्या योगदानातून वडवळ-कुसावडे येथील पाण्याच्या टाकीचा उद्घघाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.

सदर मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन व फित कापुन झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती अश्विनी देव देशमुख ह्यांनी भूषविले.प्रमुख उद्घाटक म्हणुन श्रीमती वृषाली पाटील (सभापती),श्री प्रकाशजी केसकर(कार्यकारी संचालक वाॅटरशेड),श्री राजेंद्र पासीलकर (प्रमुख मानव संसाधन व आस्थापना विभाग गोदरेज),श्री विश्वनाथ पाटील(उपसभापती),श्री भाऊसाहेब पोळ(गटशिक्षण अधिकारी),श्रीमती प्रीतीलता गायकवाड(वाॅटरशेड),श्री भगवान वाघमारे(सरपंच),श्री रमेश भांडारकर(जनरल मॅनेजर गोदरेज),श्री प्रफुल्ल मोरे(सि.मॅनेजर सी एस आर गोदरेज),श्री तानाजी चव्हाण (मॅनेजर सी एस आर गोदरेज),श्री मधु मिस्त्री(सि मॅनेजर गोदरेज),श्री विठ्ठल मोरे(मा अध्यक्ष कोयना समाज),श्री जितेंद्र सकपाळ(उपाध्यक्ष अखिल कोयना समाज),श्रीमती स्नेहा मरागजे (उपसरपंच) मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक मरागजे ह्यांनी केलं.

आपल्या मनोगतातून बोलताना पासीलकर साहेब म्हणाले कि,120 वर्ष आधीपासूनची गोदरेजची परंपरा आहे.खालापुर तालुक्यातील 14 गावांत पाणी,महिला सक्षमीकरण, बचतगट, किशोरी मेळावे,तरुणांसाठी स्कील सेंटर उभारणी तसेच 50 पेक्षा जास्त महिला उद्योग सुरू केलेत. छत्तीशीसाठी शिक्षण व शाळा सक्षमीकरण म्हणुन वडवळ, तांबाटी आणि वावोशी विद्यालया मध्ये वर्ग खोल्या,डिजीटल क्लास रुम ह्याशिवाय वृक्ष लागवड व संवर्धन,पाणी साठवण बंधारे आणि विविध शिबिरांच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्य गोदरेज सातत्याने करत आलेली आहे.श्री प्रकाशजी केसकर ह्यांनी मनोगतातून पाण्याचे महत्व व भविष्यात पाणी साठा कशा रितीने करायचा ह्या संदर्भात उपयुक्त माहीती पुरवली.
सदर कार्यक्रम प्रसंगी गावातील सक्षम आरोग्य समिती सदस्य तसेच गुणवंत मुली व महिला ह्यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

ह्या कार्यक्रमास समस्त ग्रामस्थ, सक्षम आरोग्य कमीटी,महिला व तरुण मंडळ कुसावडे-वडवळ बहुसंख्येने उपस्थित होते. ⭕

Previous articleभारतीय मराठा संघ, मुंबई प्रदेश तर्फे शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली 🛑
Next articleशिवजयंतीचे औचित्य साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे जयगड येथे स्वच्छता मोहीम संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here