• Home
  • कामातुरांण भय न लज्जा पुरोगामी महाराष्ट्र हादरला!

कामातुरांण भय न लज्जा पुरोगामी महाराष्ट्र हादरला!

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210121-WA0088.jpg

संपादकीय अग्रलेख!
कामातुरांण भय न लज्जा
पुरोगामी महाराष्ट्र हादरला!
वाचकहो,
कामांध वासनेने पछाडलेल्या वासनांध नराधमांना कुठलीच चाड कायदा नावाची भिती राहिलेली नाही.
आपल्या पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात स्त्री स्वतंत्र राहिली नाही.
अत्याचारी बलात्कारी खुलेआम नंगानाच करीत आहेत.तरीही कायदा कठोर केला जात नाही हि भयानक शोकांतिका आहे.बलात्कार करणारे तुरुंगात सरकारी पाहुणचारावर पोसले जात आहेत.एखाद्याही बलात्कारी गुन्हेगाराला अद्याप कठोर शिक्षा झालेली नाही,म्हणूनच हि बलात्कारी गुन्हेगारीची पिल्लावळ महाराष्ट्रात फोफावत चालली हे कायद्याच्या दृष्टीने लाजीरवाणेच नव्हे तर शरमेची गोष्ट आहे.
संपूर्ण जगभरात गाजलेल्या मराठा समाजाला एकत्रित आणणाऱ्या कोपर्डीच्या घटनेतील ताईच्या गुन्हेगारांना अद्यापही सजा होऊ नये म्हणजे हे कशाचे लक्षण समजायचे?वास्तविक शासनाने फाँस्ट ट्रँक न्यायालये सुरु करण्याच्या घोषणा केल्यात मात्र पुढे त्याव्दारे किती वासनांध नराधमांना शिक्षा झाली हा संशोधनाचा विषय ठरतो.
वासनांध नराधमांना आता वयाचे देखील भान राहिलेले नाही.अगदी काल परवा नांदेड भागात अवघ्या पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिचा निघृणपणे खुन करण्याची घटना संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडते.मुळात या घटनाच काळीमा फासणा-या आहेत.
आम्ही किती दिवस फक्त मेणबत्या पेटवून निषेध करीत फिरायचे.आणि गुन्हेगार मात्र सरकारी पाहुणचारावर पोसायचे हि पध्दतच चुकीचे ठरते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात अंमलात असलेली पध्दतही आता राबवायला हवी तरच गुन्हेगारांना जरब बसेल.एव्हढेच! राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक

anews Banner

Leave A Comment