• Home
  • नियोजित विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत

नियोजित विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210121-WA0192.jpg

नियोजित विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत
कृषीमंत्री दादाजी भुसे                                                       मालेगांव,(सतिश घेवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

आज कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी मालेगांव महानगपालिकेच्या मुलभूत सुविधांअंतर्गत रस्ते, आरोग्य, स्वच्छता, वीज, पाणी पुरवठा आदी कामकाजाचा आढावा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रं. 1 येथील कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला.

शहरात महानगरपालिकेमार्फत करण्यात येणारी नियोजित विकास कामे प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी मंत्रीमहोदय श्री. भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत.

रस्ते दुरुस्ती व स्वच्छता संदर्भात येत्या पंधरा दिवसात निर्णय घेण्यात यावा,तसेच शहरातील आग्रा रोड, कॅम्प रोड, सटाणा रोड, स्वच्छ करणे व काटेरी झुडपे काढण्यासाठी मदत लागल्यास दोन जेसीबी उपलब्ध करुन कामांचा निपटारा लवकरात लवकर करावा.

बंद अवस्थेतील पथदिवे हे येत्या दहा दिवसात दुरुस्ती करून चालू करावेत. महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणारे विकास कामे दर्जेदार पद्धतीने करून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश श्री. भुसे यांनी यावेळी दिलेत.

कोविड-19 लसीकरणाबाबत सविस्तर माहिती यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. लसीकरणानंतरही आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केले.मालेगाव तालुक्यातील सर्व महानगर पालिका आयुक्त व कर्मचारी हजर होते

anews Banner

Leave A Comment