राजेंद्र पाटील राऊत
तळसंदे उपसरपंचपदी सावित्री चव्हाण
तळसंदे ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार डॉ. विनय कोरे यांचे समर्थक माजी उपसरपंच मनोहर चव्हाण यांच्या गटाच्या सौ. सावित्री राजाराम चव्हाण यांची निवड झाली .अध्यासी अधिकारी म्हणून लोकनियुक्त सरपंच अमरसिंह पाटील यांनी काम पाहिले
.माजी उपसरपंच संग्रामसिंह शिंदे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली .सदर जागेसाठी सावित्री चव्हाण , विशाल चव्हाण, विजया चव्हाण ,यांनी अर्ज दाखल केले होते. झालेल्या निवडणुकीत सावित्री चव्हाण विजयी झाल्या
. यावेळी सदस्य सुनिता चव्हाण ,महेश कुंभार , प्रकाश कोळी, शिवाजी पाटील, शांताबाई पाटील ,नरेश कांबळे, सुधा कांबळे , राजेंद्र शिंदे, अर्चना पाटील ,मनीषा संकपाळ, संग्रामसिंह शिंदे ,जयश्री संकपाळ, ग्राम विकास अधिकारी व्ही आर चव्हाण उपस्थित होते .
युवा मराठा न्यूज नेटवर्क .