• Home
  • व-हाणे गावात दलित समाजाला डावलले उमेदवारी करण्यापासून

व-हाणे गावात दलित समाजाला डावलले उमेदवारी करण्यापासून

राजेंद्र पाटील राऊत

FB_IMG_1608201866393.jpg

लोकशाहीची घोर विटंना…!!
व-हाणे गावात दलित समाजाला
डावलले उमेदवारी करण्यापासून
मालेगांव,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज)-गावगाडयाच्या राजकारणात वेळोवेळी लोकशाहीची विटंबना करुन काळीमा फासण्याचे घोर महापाप काही मातब्बर राजकारणी आपल्या सोयीच्या राजकारणासाठी करीत असतात.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायतीच्या निवडणूकाची मतदान प्रक्रिया उद्या पार पडत असतानाच,एक गंभीर व खळबळजनक बातमी समोर येत आहे,नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या व-हाणे गावी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत दलित समाजाच्या व्यक्तीला उमेदवारीच करता येणार नाही,अशी व्युहरचना करुन ठेवल्याने गेल्या दोन पंचवार्षिक निवडणूकीपासून व-हाणेतील दलित समाज उमेदवारी करण्यापासून वंचीत आहे.आणि लोकशाही प्रधान देशात दलित बांधवाना त्यांच्या हक्काच्या मुलभूत अधिकारापासून डावलण्याचे महापाप करण्याबरोबरच लोकशाहीची थट्टा मांडण्यात आल्याच्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
ज्या महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला अभिप्रेत असलेली राज्यघटना लिहून मतदानाचे व लोकप्रतिनिधीत्वाचे महत्त्व विषद केले,त्याच बाबासाहेबांच्या अनुयायावर हा असा अन्याय केला जात असून,त्यांना त्यांच्या हक्काच्या उमेदवारीपासुन डावलण्यात आल्याने या घटनेच्या निषेधार्थ मालेगांव तालुका वंचीत बहुजन आघाडीचे पदाधिकारी व भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु.पी,ए.मदान यांचेकडे सदर गावातील निवडणूक रद्द करुन चौकशी करण्यात यावी व त्या गावात फेरनिवडणूक घेण्याची मागणी करणार आहे,याप्रश्नी आंदोलनात्मक पाऊल उचलण्याचा निर्णयही वंचीत बहुजन आघाडी व भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिका-यांनी आज झालेल्या बैठकीतुन घेतला आहे.

anews Banner

Leave A Comment