• Home
  • नांदेड जिल्ह्यात 1013 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया तर 907 ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान…

नांदेड जिल्ह्यात 1013 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया तर 907 ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210110-WA0088.jpg

नांदेड जिल्ह्यात 1013 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया तर 907 ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यात एकूण 1309 ग्रामपंचायतींपैकी 1015 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार होते यापैकी मुखेड तालुक्यातील जांब व कंधार तालुक्यातील आलेगाव या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुकी रद्द झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्ष 1013 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. 1013 ग्रामपंचायतींपैकी पूर्णतः बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या 85 इतकी आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण जागांपैकी काही जागेसाठी वैध नामनिर्देशन पत्र अपात्र असल्याने व उर्वरित जागा बिनविरोध झाल्याने प्रत्यक्ष मतदान होणार नाही. अशा ग्रामपंचायतीची संख्या 21 तर प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या 907 इतकी आहे . एकूण जागांची संख्या 8 617 इतकी असून एकही वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांची संख्या 102 तर माघारीच्या दिनांक नंतर 1 जागेसाठी फक्त एकच वैध नामनिर्देशन पत्र उरल्याने बिनविरोध निवडणूक झालेल्या जागांची संख्या 1653 तर प्रत्यक्ष जिल्ह्यात मतदान होणाऱ्या जागांची संख्या एकूण 6862 इतके आहे. अशी माहिती आज रोजी उपजिल्हाधिकारी श्री शरद मंडलिक यांनी दिली आहे.

anews Banner

Leave A Comment