राजेंद्र पाटील राऊत
दादा भाऊ ताई काका म्हणून करत आहेत विनवणी . दिली जात आहे गावाकडे या उमेदवाराकडून मतदारांना हाक ..
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार
युवा मराठा न्यूज नेटवर्क.
मुखेड तालुक्यातील 108 ग्रामपंचायतीसाठी 30 डिसेंबर रोजी3012 अर्ज प्राप्त झाले आहेत निवडणुकीसाठी नवीन वर्षात जोरदार रस्सीखेच होणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून दादाभाऊ ताई अण्णा काका गावाकडे या की हो अशी हाक दिली जात आहे 23 ते 30 डिसेंबर दरम्यान नामनिर्देशनपत्र भरता येणार होते यात 24 26 27 डिसेंबर रोजी प्रशासकीय सुट्टी असल्याने उमेदवारांना चार दिवसात कागदपत्रांची जुळवाजुळव ऑनलाईन करण्यासाठी इंटरनेटच्या अडचणीमुळे इच्छुक उमेदवारांचा पूर्ण वेळ निघून गेला असल्याने अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसून आली ग्रामपंचायत निवडणुकीला आता चांगलाच वेग आला आहे पॅनमध्ये असणाऱ्या इच्छुकांनी निवडणुकीचा रणसंग्राम प्रारंभ होऊन बाहेरगावी गेलेल्या लोकांना फोन करत आहेत भाऊ दादा ताई गावाकडे कधी येणार अशी विचारणा सुरू केली आहे कोरोना च्या सुरुवातीला मात्र लोकडॉन काळात गावाबाहेर असणाऱ्या नागरिकांना गावातील लोकांनीच गावबंदी करून गावात येऊ न देण्याची भूमिका घेतली होती यामुळे पायी आलेल्या गावकऱ्यांनी नाहक त्रासाझाला सामोरे जावे लागले होते दुखावलेले ही मतदार गावचा रस्ता धरतील का ? असा प्रश्नही उपस्थित आहे