पेठ वडगांव शहरातील जुगार अड्यावरील डाँ. बी.धिरज कुमार (आय.पी.एस.) अधिकारी यांनी केलेल्या कारवाई पाठोटाठ
इचलकरंजी शहरातील भुवनेश्वरी कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या ३पानी जुगार क्लबवर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने छापा टाकला. त्यामध्ये क्लब मालकासह १२जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून १४ हजार रुपये, ९ मोबाईल, ६ मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा २ लाख ५५ हजार ११७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. क्लबमालक लक्ष्मण बाळकृष्ण इंगळे (३७), रघुनाथ रावसाहेब पवार (५५, दोघे रा. लिगाडे मळा), विलास दत्तात्रय भांदिगरे (५८), तौफिक शब्बीर पटवेगार (३०, दोघे रा.कोरोची, ता. हातकणंगले), प्रेमराज श्रीराम जोशी (४०, रा. पुजारी मळा), गफूर बाबू बेपारी (३९, रा. मॉडर्न हायस्कूलजवळ), सचिन शामराव पाटील (३९, रा.
बावणे गल्ली), वृषभ लक्ष्मण कणंगले (३१, रा. सदलगा-कर्नाटक), मुजम्मिल नजीर सुतार (३०, रा. जवाहरनगर), अझरूद्दीन रमजान सलाते (३२, रा. दत्तनगर), अर्जुन नंदकुमार वडे (३०, रा. अण्णा रामगोंडा शाळेजवळ), सत्यम आनंदा खांडेकर (३०, रा. कबनूर, ता. हातकणंगले) इत्यादी जुगार अड्यावर खेळताना सापडलेल्यांची नावे आहेत ,
या सर्वांना शिवाजीनगर गुन्हे शोधपथकाने छापा टाकून अटक केली आहेत.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .