पेठ वडगांव येथील नगरपालिकेच्या मुख्य चौकात महालक्ष्मी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ हे शासकीय परवानगीने सुरू आहे. परंतु , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मंडळ नुकतेच सुरू करण्यात आले होते. दरम्यान, गुरूवारी रात्री बिगर परवाना तीन पानी जुगार सुरू असल्याचा पोलिसांना संशय आल्यामुळे पोलीस पथकाने छापा टाकला. यामध्ये ३९ जणांना ताब्यात घेतले आहे. हि कारवाई प्रशिक्षणार्थीआय.पी.एस. अधिकारी डाँ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली
उपनिरीक्षक नसीर खान व इतर पोलिस कर्मचारी राजू पाटील, किशोर पवार (आर.टी.पी.सी.), विकास घस्ते, रणवीर जाधव, जितेंद्र पाटील, नरसिंग कुंभार, अशोक जाधव, रामराव पाटील, अमरसिंह पावरा, दादा माने, आदींच्या पथकाने कारवाई केेेली. याप्रकरणी कारवाई केलेल्यांची नावे अशी-विशाल विनायक माने (वय २४), अविनाश अनिल माने (३०), अनिल बाळू माने (६३), महेश गणपती डेळेकर (२३),जयदीप दिनकर पाटील (४२), गोटीराम बहादूर चौगुले (४४), शिवप्रसाद मल्लाप्पा हंजगे (६१), रमेश बाळू माने (४८), हेमंत सीताराम सावंत (३७,रा.सर्व पेठवडगाव), लक्ष्मण बाबासाहेब बामणे (४४), सुभाष यशवंत भासर (५५, दोघे रा. शिगांव, ता. वाळवा), इस्माईल इबाहिम शेख (६०, रा. इस्लामपूर, ता.वाळवा), गाेपाळ रामचंद्र लड्डा (४७), प्रकाश अण्णा चौगुले(६३),अयुब हबीब अन्सारी(४३), जावेद महम्मदसाहब मुल्ला(२९),तातोबा आनंदा कांबळे(५२),मुबारक हुसेन पठाण(५०), निखिल बाळकृष्ण धुमाळ (२७), दिलावर अजिज बागवान(५३), गौस जवाहर पटेल (३४, रा. सर्व इचलकरंजी), नुरबादशाह कादरबादशाह सय्यद (५४), संजय नारायण काशिद(५२), सुरेश राजाराम टिवले(६६, रा. कोल्हापूर), राजुद्दीन गुलाब मल्लीदवाले (६२, रा. संभाजीनगर), भगवान ज्ञानदेव हवालदार( ६२,रा.
संभाजीनगर,कोल्हापूर), सुधीर गोपाळराव पवार (६२, रा. सरदार तालीम, कोल्हापूर), वसंत मरप्पा पुजारी (वय ४०,रा. कोल्हापूर), प्रकाश भिमा घस्ते (४६, रा. गडहिंग्लज), मारुती नारायण कोळी (वय ६३, रा.
शिवनाकवाडी), गणी बाबासो पटवेगार (४५, रा. आष्टा), मदार इस्माईल बेपारी(५२, रा. गांधीनगर), बाबासो जिनगुंडा पाटील(५४, रा. कुरुंदवाड), कृष्णात शामराव वडगांवे (५८, रा.कवठेपिरान, ता. मिरज), संजय खारकांडे (५१), संजय धोंडिराम माने (४३, दोघे रा. कोरोची), प्रसन्न पांडुरंग कुलकर्णी (३३ रा. सांगलीवाडी, ता. मिरज), संजय शंकर चव्हाण (५६, रा. सावर्डे).
इत्यादींच्यावर कारवाई करण्यात आली आहे, आत्तापर्यंत हातकणंगले तालुक्यातील वडगांव शहरातील सर्वात मोठी कारवाई झाल्याने शहरात खळबळ माजली आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क.