Home महाराष्ट्र शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेस प्रारंभ

शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेस प्रारंभ

136
0

राजेंद्र पाटील राऊत

शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेस प्रारंभ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत मॅट्रिकोत्तर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये सन २०२०-२१ मध्ये प्रवेश मिळालेल्या अनु.जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणालीद्वारे  शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा इ.योजनांच्या लाभासाठी ३ डिसेंबर पासून ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  mahadbtmahait.gov.in या वेब लिंकचा वापर करावा असे आवाहनही सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी त्यांचे बँक खाते NPCIL शी आधार लिंक करणे आवश्यक आहे. अर्ज नोंदणीकरिता आपल्या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे सहाय्य घ्यावे. याबाबत संबंधित महाविद्यालयांनीही आपल्या  स्तरावरून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याबाबत अवगत करुन योजनेची आवश्यक कागदपत्रे व अटी याबाबत माहिती द्यावी. याबाबतच्या सूचना महाविद्यालयाच्या दर्शनी भागात/ नोटीस बोर्डवर देण्यात याव्यात व परिपूर्ण स्वरूपातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास ऑनलाईन मान्यतेसाठी सादर करावेत. याबाबत कोणत्याही स्वरूपाची हयगय होणार नाही याची दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleछ. शिवाजी महाराज चौक मंडळाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा 
Next articleमुंबई – आग्रा महामार्गावर उमराणे जवळ तवेरा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात ; तीन जणांचा मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here