राजेंद्र पाटील राऊत
युनिकेम रासायनिक पाणी प्रकरणी रोठ बुद्रुक ग्रामस्थ व भाजपाचा ठिया रायगड ,(युवा मराठा न्युज नेटवर्क)-धाटाव एमआयडीसी तील प्रख्यात युनिकेम कंपनी पुन्हा एखादा चर्चेला आली. रात्रीचा फायदा घेत केमिकल युक्त रासायनिक पाणी पावसाचे पाणी सोडण्याकरीता नाल्यातुन सोडण्यात आले. त्यामुळे रोठ ब्रु. ग्रामस्थ व भाजपाचे पदाधिकारी यांनी मुजोर कंपनीच्या व्यवस्थापनेविरोधात आंदोलन करण्यात आले. परंतु हे आदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपाचे पदाधिकारी आक्रमक होताच कंपनी फाँक्टरी हेड संजय नारकर याना आंदोलन कर्ता समोर झुकावे लागले. दरम्यान रोठ नदी पुर्णपणे प्रदुषित झाली होती त्यामुळे ग्रामस्थ व भाजपाचे पदाधिकारी व्यवस्थापन याना भेटण्यास टाळाटाळ केली . नाईलाजाने आंदोलन करावे लागले . या आदोलनानतंर जर का पुन्हा रासायनिक पाणी सोडले तर ग्रामपंचायत सदस्य राजेश डाके, नरेश कोकरे, कृष्णा बामने यानी कंपनीविरुद्ध भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग याच्या नेतृत्वाखाली तीवं आंदोलन करण्याचा या वेळी ईशारा देखील देण्यात आला.