पेठ वडगांव : शहरातील पद्मारोडवरील मुख्य बाजारपेठ चौकात (गांधी चौक) अतिक्रमणाचा धोकादायक विळखा असून त्याकडे वडगांव नगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे.
पद्मारोडवरील गांधीचौकामधे पुजेचे साहित्य , फळे विकणाऱ्या विक्रेता धोकादायक विजेच्या मोठ्या डिपी (ट्रान्सफाँर्म) खाली बसुन विक्री करत आहे. गांधीचौकातील फुटाणे टेलर्स दुकानासमोर गटारीवर मोठे धोकादायक भगदाड पडले असुन त्याकडेही पालिकेने दुर्लक्ष केले आहे.
सदर गांधी चौकामधिल जागेत विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असुन त्यांच्या जिवाला धोका असुन डिपी (ट्रान्सफाँर्म) च्या खाली कोणालाही विक्रिस बसण्यासाठी परवानगी देऊ नये. सदर जागेस धोकादायक क्षेत्र घोषित करावे , एखाद्या वेळेस डिपी , (ट्रान्सफाँर्म ) वरती शार्टसर्कीट होऊन विक्रेत्यास किंवा ग्राहकांच्या जिवास धोका निर्माण होऊ शकतो, तेथिल विक्रेत्यांना विक्रीसाठी बसूनये यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार सुचना देऊनही विक्रेते जाणूनबुजून बसत आहेत.
पद्मारोड हा मुख्य बाजार पेठ असुन त्या रोडवरती मालवाहु छोटी मोठी वाहनांची रहदारी असते ,
सदर चौकामधे अतिक्रमण वाढल्यामुळे इतर वाहनास वळण घेताना आडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे वडगांव नगरपालिका प्रशासनाने तात्काळ त्या पुजेचे साहित्य विक्रेत्यास तेथून हलवावे अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .