• Home
  • *मुखेड तालुक्यासाठी विमा नैसर्गीक आपत्ती मधुन मंजुर …*

*मुखेड तालुक्यासाठी विमा नैसर्गीक आपत्ती मधुन मंजुर …*

*मुखेड तालुक्यासाठी विमा नैसर्गीक आपत्ती मधुन मंजुर …*
मुखेड,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील एक लाख बारा हजार नऊशे पन्नास शेतकर्‍यापैकी फक्त तेरा हजार एकशे नव्यानव शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्ती मधुन पिक विम्याचा लाभ
मंजुर शेतकर्‍यांचे पंचनामे ग्राह्य धरुन वंचीत नव्वानव्व हजार सातशे एकावन्न शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीचा लाभ द्या अन्यथा ईफको टोकीयो पिक विमा कंपनीचे कार्यालय फोडु बालाजी पा.ढोसणे यांचा इफको टोकीयो कंपनीला इशारा

मुखेड तालुक्यातील सोयाबीन,मुग,ऊडीद या पिकांचा पिक विमा नैसर्गिक आपत्ती (Loclized clamity) मधुन मंजुर झाला असुन मुखेड तालुक्यातील तेरा हजार एकशे नव्यानव शेतकर्‍यांना बारा कोटी अठ्यानव लाख सत्यानव हजार एकशे बत्तीस रुपयांचा पिक विमा शेतकर्‍यांचा खात्यावर जमा झाल्याची माहीती पिक विम्याचे गाढे अभ्यासक शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी पञकार परीषदेत दिली.तालुक्यात मुग,उडीद,सोयाबीन पिकांचा एकुण एक लाख बारा हजार नऊशे पन्नास शेतकर्‍यांनी आपल्या पिकावर विमा ऊतरविला होता पण फक्त तेरा हजार एकशे नव्यानव शेतकर्‍यांना पिक विम्याचा लाभ मिळाल्याने तालुक्यातील नव्वानव्व हजार सातशे एकावन्न शेतकरी आँनलाईन न केल्याने व नुकसानीची माहीती पिक विमा कंपनीला न कळविल्याने शेतीतील पिकांचे नुकसान असुनही वंचीत राहत असल्याने वंचीत शेतकर्‍यांना पाञ शेतकर्‍यांचा पंचनामा ग्राह्य धरुन पिक विम्याचा लाभ द्यावा अन्यथा पिक विमा कंपनीचे कार्यालय फोडु असा ईशारा शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे ईफको टोकीयो पिक विमा कंपनीला दिला.
तेरा हजार एकशे नव्यानव शेतकर्‍यांना दिवाळी पुर्वी पिक विम्याची रक्कम जमा झाल्याने आनंदाचे वातावरण असुन नव्वानव्व हजार सातशे एकावन्न शेतकरी बांधवात नाराजी व चिड आणणार्‍या प्रतिक्रिया शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांना दुरध्वनीद्वारे दिले.वंचीत शेतकर्‍यांना तात्काळ लाभ द्यावा अन्यथा जाचक अटीमुळे शेतकर्‍यांची लुट होत असलेल्या पिक विमा कंपनीचे कार्यालय नव्वानव्व हजार सातशे एकावन्न शेतकर्‍यांना सोबत घेवुन फोडणार असल्याचा गंभीर इशारा ढोसणे यांनी पञकार परीषदेत दिला.या पञकार परीषदेला शेतकरी बालाजी पाटील सांगवीकर,रमाकांत पाटील जाहुरकर,माधव पाटील खदगांवे,मन्मथ खंकरे,निळकंठ पाटील कोळनुरकर हे ऊपस्थितीत होते.
तालुक्यातील पिक विम्याच्या लाभापासुन वंचीत शेतकर्‍यांना महसुल मंडळातील बाधीत क्षेञ व त्या महसुल मंडळातील पाञ शेतकर्‍यांच्या पंचनामा गृहीत धरुन पिकविमा कंपनीने सरसकट मदत द्यावी व सरकारने पिक विम्याच्या जाचक अटी बदलाव्यात अन्यथा शेतकर्‍यांत प्रचंड चिड निर्माण होईल यांचे रुपातंर आंदोलन होईल यांची नोंद घ्यावी.
बालाजी पाटील ढोसणे ….

anews Banner

Leave A Comment