Home Breaking News *डिजीटल कार्ड धारकानाचं कोविड ची लस मिळणार ,*

*डिजीटल कार्ड धारकानाचं कोविड ची लस मिळणार ,*

102
0

*डिजीटल कार्ड धारकानाचं कोविड ची लस मिळणार ,*

*युवा मराठा न्यूज नेटवर्क*

भारतातील कोविड रुग्णांची संख्या 76 लाखांच्या आसपास पोहचली असून लसीकरणासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन घोषणा केली होती की, देशातील प्रत्येक नागरिकास राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानातंर्गत हेल्थ कार्ड देण्यात येईल. आता 2 महिन्यांनी पंतप्रधान मोदींनी पुन्हा ‘लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल हेल्थ आयडी वापरला जाईल’ असे संकेत दिले आहेत.
‘ग्रॅन्ड चॅलेंज’च्या वार्षिक सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘कोविड ची लस तयार करण्याच्या बाबत भारत पुढे असून, काही लशींच्या चाचण्या शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत.
डिजिटल हेल्थ कार्डसोबत डिजिटल नेटवर्कचा वापर करण्यासाठी एका वितरण प्रणालीवर काम केले जाईल. त्यामार्फत नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. भारतातील नागिरकांनी विविधतेने नेहमीच सर्वांना आकर्षिक केलं आहे. आपला देश अमेरिकेच्या लोकसंख्येच्या चौपट आहे. आपली राज्ये युरोपियन देशांइतकी आहे. भारताचा कोविड मृत्युतर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. दुसरीकडे दररोज नवीन रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. तद्वतच भारताचा रिकव्हरी रेट ८८ टक्के झाला आहे.’
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी स्वतंत्रदिनी बोलताना हेल्थ कार्डबाबत माहिती सांगितली होती. ते म्हणाले होते की, ‘प्रत्येक भारतीय नागरिकास हेल्थ कार्ड दिले जाईल. हे कार्ड प्रत्येक भारतीयांच्या आरोग्य खात्याप्रमाणे काम करेल. या कार्डमध्ये तुमची प्रत्येक चाचणी, आजार, कोणत्या डॉक्टरांकडून कोणते औषध घेतले आहे, त्याचे उपचार केव्हा घेतले, त्याचे अहवाल काय आले या सर्व बाबींचा समावेश असेल. डॉक्टरांच्या वेळ घेणं, पैसे जमा करणे, दवाखान्यात प्रिस्क्रिप्शन मिळवण्यासाठी गर्दी असो, या सर्व समस्यांपासून लांब राहण्यासाठी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची मदत होईल. तसेच प्रत्येक नागरिक उत्तम आरोग्यासाठी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असेल.’

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज )*

Previous article*डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची वेळ व व्याप्ती वाढवावी*
Next article*शेतपिकांची पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पाहणी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here